सिल्लोड तालुक्यात ढगफूटी सदृश्य पाऊस,नदी-नाल्यांना पूर

माणिकनगर (जि.औरंगाबाद) - केऱ्हाळा फाटा ते केऱ्हाळा पळशी गावाकडे जाणाऱ्या ओढ्‍याला आलेला पूर.
माणिकनगर (जि.औरंगाबाद) - केऱ्हाळा फाटा ते केऱ्हाळा पळशी गावाकडे जाणाऱ्या ओढ्‍याला आलेला पूर.
Updated on

माणिकनगर (जि.औरंगाबाद) - सिल्लोड (Sillod) तालुक्यातील माणिकनगर (भवन) परिसरात सायंकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस (Heavy Rain) झाला. या पावसामुळे परिसरातील निल्लोड, केऱ्हाळा, पळशी, बनकिन्होळा, बाभूळगाव, गेवराई शेमी, चिंचखेडा गावच्या नदी-नाल्यांना चांगलाच पूर आला होता. यात जनजीवन (Aurangabad) विस्कळित झाले होते. निल्लोड, गेवराई सेमी परिसरात १ तास धुवाधार पाऊस झाल्याने बाभूळगाव बनकिन्होळा येथील नदी व नाल्यांना पूर आल्याने बनकिन्होळा येथे असलेली निल्लोड पाझर तलावाची पूर नियंत्रण रेषेपर्यंत पाणी आले आहे. त्याच बरोबर केऱ्हाळा फाटा ते केऱ्हाळा, पळशी जाणाऱ्या रस्त्यावरील शिवाचा (महादेव मंदिर जवळ) नाल्याला पूर आल्याने सदर रस्ता पाण्याखाली गेला होता.

माणिकनगर (जि.औरंगाबाद) - केऱ्हाळा फाटा ते केऱ्हाळा पळशी गावाकडे जाणाऱ्या ओढ्‍याला आलेला पूर.
मांजरा धरण भरले, सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

परिणामी, काही तास वाहतूक बंद होती. केऱ्हाळा गावातील शेख रफीक शेख हुसेन, शेख रियाज शेख बुढन, किशोर महादू वाघमारे यांच्या घरामध्ये पुराचे पावसाचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. तसेच गावच्या पाठीमागील मशिदीलगतची नदी दुथडी भरून वाहत असल्याने शेतातून गावाकडे येणाऱ्यांची मोठी पंचायत झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.