छ्त्रपती संभाजीनगर : मागील आठवडाभरापासून विश्रांती घेणारा पाऊस सक्रिय झाला असून त्याने आज नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत नदी-नाल्यांना पूर आला. हिंगोलीतील काही वसाहतीत पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. शेतांतही पाणीच पाणी झाले. अन्य जिल्ह्यांतही पावसाची संततधार सुरू होती. या पावसामुळे धरणांतील जलसाठे वाढीसाठी मोठी मदत होत आहे. काही धरणे भरली असून विसर्ग करावा लागत आहे.