औरंगाबादमध्ये माजी महापौरांसह केणेकरांवर गुन्हा

खंडपीठाने गंभीर दखल घेतल्यानंतरही राजकीय नेत्यांची स्टंटबाजी सुरूच
high court
high courthigh court
Updated on

औरंगाबाद: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच एकीकडे शिवसेनेच्या आमदारांनी गर्दी जमवत जलवाहिनीचे उद्‍घाटन केल्याचा आणि माजी महापौरांनी गर्दी जमवत वाढदिवस साजरा केल्याची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने घेतली (aurangabad bench high court) आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधीच असे कसे काय वागू शकतात? अशी विचारणा करत कारवाईची माहिती खंडपीठाने मागविली असतानाच दुसरीकडे मंगळवारी (ता.११) भाजपच्या माजी महापौरांसह शहराध्यक्षांनी गर्दी करत घोषणाबाजी केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे अशोक जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, माजी महापौर बापू घडामोडे यांच्यासह शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता.११) चिकलठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लँट सुरू करण्यात आलेला नाही, असे म्हणत तेथे घोषणाबाजी केली. (high court on politicians covid19 curfew corona virus)

high court
'मंत्री भुमरेंविरोधात काय कारवाई केली?' खंडपीठाचा प्रश्न

यावेळी कार्यकर्त्यांसह समर्थकांची एकच गर्दी उसळली होती. दरम्यान, जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी महापौर घडामोडे (रा.रामनगर, मुकुंदवाडी), संजय केणेकर (रा. अजबनगर), राजू शिंदे (रा. चिकलठाणा) शेख हाफीज, वर्षा सोळुंके (रा. एन-१) आदी विरोधात मुकुंदवाडी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सोनगिरे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.