पैठण : यावर्षी तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. सिंचनाची व्यवस्था असल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा, मका, उन्हाळी सोयाबीन आदी पिकांची पेरणी करून भाजीपाल्यांचीही लागवड केली.
परंतु खताच्या किमतीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी सिंचनाच्या सोयीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन केले आहे.
परंतु यावर्षी रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडले आहेत. रासायनिक खतांचे भाव वाढल्याने खतांचा वापर निम्म्याने घटला आहे. पेरणी झाल्यानंतर पिकांची वाढ होण्यासाठी युरिया खताची शेतकऱ्यांना आवश्यकता असते.
परंतु कृषी केंद्राच्या तसेच तालुक्यातील कृषी कार्यालयाच्या संगनमताने युरिया खताचा सर्व शेतकऱ्यांना पुरवठा होत नाही. त्यामुळे मागणी करूनही युरिया शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे.
तर दुसरीकडे खतांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. केंद्र व राज्य सरकारचे दुर्लक्ष झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. ऐन रब्बी हंगामात डीएपी खत वगळता सर्व खतांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे शासनाने खताचे दर नियंत्रणात ठेवावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
असे आहेत रासायनिक खताचे दर (प्रती गोणी)
डीपीए : १३५०
१०×२६×२६:१३९५
१५×१५×१५:१४७०
१४×२८×१४:१७९५
युरिया : २६६
सिंगल सुपर फॉस्फेट: ५८०
२०×२०×०: १४७०
१६×१६×१६:१४९०
१२×३२×१६:१४७०
खतांच्या ३५ ते ४० टक्के दरवाढीमुळे शेतकरी यावर्षी खतांची कमी प्रमाणात खरेदी करत आहेत. खरेदी केंद्रामध्ये येणारा प्रत्येक शेतकरी खताच्या किमती कमी होतील काय? असा प्रश्न विचारत आहे. कपाशीचे भाव पडल्याने ही शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.
-रामेश्वर सुसे, संचालक, कृषी जगत केंद्र, पैठण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.