Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर उच्चदाब वाहिनीचे काम

दोन दिवस दुपारी १२ ते ४ वेळेत पर्यायी मार्ग वापरावा लागणार
High pressure channel work on samriddhi mahamarg alternative route between 12 PM to 4 PM for two days
High pressure channel work on samriddhi mahamarg alternative route between 12 PM to 4 PM for two daysSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समिशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतूक मंगळवारी (ता. २१) आणि बुधवारी (ता. २२) असे दोन दिवस दुपारी १२ ते ४ यावेळात बंद असेल.

उर्वरित कालावधित वाहतूक सुरळीत सुरू राहील. बंद कालावधित पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविण्यात आली आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी कळविले आहे.

समृद्धी महामार्गावर दोन दिवस पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरच्या कामादरम्यान वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग वापरावा लागणार आहे. ता. १२ ते ४ या वेळेत दोन दिवस जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान समृद्धी महामार्गावरील जालना इंटरचेंज (आयसी-१४) ते सावंगी इंटरचेंज (आयसी-१६)

दरम्यान नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक निधोना (जालना) इंटरचेंज आयसी-१४ मधून बाहेरपडून निधोना एमआयडीसी मार्गे- राष्ट्रीय महामार्ग ७५३ अ (जालना-छत्रपती संभाजीनगर) मार्गे केंब्रीज शाळेपर्यंत नंतर ती उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज क्रमांक आयसी-१६ (छत्रपती संभाजीनगर) येथे समृद्धी महामार्गावर प्रवेश करून शिर्डीकडे रवाना होईल. समृद्धी महामार्गावरील शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक,

सावंगी इंटरचेंज क्र. आयसी-१६ (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडून वर नमूद केलेल्या मार्गावरून (विरुद्ध दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज क्र. आयसी-१४ या ठिकाणी समृद्धी महामार्गावर प्रवेश करून नागपूरकडे रवाना होईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक यांनी कळविले आहे. उर्वरित कालावधित वाहतूक सुरळीत सुरू राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.