Loksabha Election : छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपच लढविणार ; अमित शहांचे स्पष्ट संकेत

मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मंगळवारी (ता.५) झालेल्या जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संभाजीनगर लोकसभेची जागा भाजपच लढवणार, याचे स्पष्ट संकेत आपल्या भाषणातून दिले.
Loksabha Election nanded
Loksabha Election nandedsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मंगळवारी (ता.५) झालेल्या जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संभाजीनगर लोकसभेची जागा भाजपच लढवणार, याचे स्पष्ट संकेत आपल्या भाषणातून दिले. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संभाजीनगरातून एक ‘कमळ’ देणार का? असा सवाल करीत त्यांनी सभेला उपस्थित जनसमुदायाकडून भाजपचा खासदार निवडून देण्याचा शब्दही घेतला.

छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा महायुतीतील कोणता पक्ष लढवणार? याची चर्चा काही महिन्यांपासून सुरू आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ अमित शहा यांनी छत्रपती संभाजीनगर येथे सभा घेऊन फोडण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून ही जागा भाजप लढवणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता. एवढेच नव्हे, तर अमित शहा आजच्या सभेत उमेदवाराबद्दलचे काही संकेत देतील, अशीही शक्यता वर्तवली जात होती. शहा यांनी उमेदवार कोण असेल? याचा सस्पेन्स कायम ठेवला असला तरी संभाजीनगरची जागा भाजपच लढवणार, हे मात्र स्पष्ट केले.

भाषणाची सुरवात करतानाच शहा यांनी ‘संभाजीनगर वालों की आवाज को क्या हुआ’ असा सवाल करत ‘मजलिस को उखाडणे का संकल्प लीजिए’, असे आवाहन करत एमआयएमवर निशाणा साधला. सभेला गर्दी झाल्यामुळे शहा खूश झाल्याचे दिसून आले, त्यांनी याचा उल्लेख आपल्या भाषणात करत शहरवासीयांचे आभारही मानले. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरातून पहिल्यांदा लढण्याची संधी भाजपने घेतली आहे, हे शहा यांच्या भाषणातून स्पष्ट झाले.

Loksabha Election nanded
Nanded politics : काँग्रेसला गळती, भाजपमध्ये भरती ; विरोधी पक्ष अजूनही संभ्रमावस्थेमध्ये

संभाजीनगर लोकसभेची जागा आमची आहे, आम्हीच ती लढवणार, असा दावा काही महिन्यांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री, आमदार, प्रवक्ते माध्यमांसमोर करत होते. परंतु, अचानक हे दावे थांबले, तेव्हापासूनच ही जागा भाजप लढवणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता. अमित शहा यांच्या आजच्या सभेने आणि त्यांनी संभाजीनगरातून मोदींच्या खासदारांमध्ये एक ‘कमळ’ निवडून पाठवणार ना? या आवाहनानंतर ही जागा भाजपच लढविणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात?

आता उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अमित शहा यांनी संभाजीनगरची जागा कोण लढणार याचे स्पष्ट संकेत दिल्यामुळे भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाला येणाऱ्या काळात उधाण येणार आहे. शहा यांनी आपल्या एकवीस मिनिटांच्या भाषणात शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, स्टॅलिन यांचा उल्लेख करत इंडिया आघाडीवर जोरदार हल्ला चढवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.