Ghati Hospital Death: 'रूग्णालयातील मृत्यू हलगर्जीमुळे नाहीत तर...', रूग्णालयाच्या प्रमुखांचे स्पष्टीकरण, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी मागवला अहवाल

छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या २४ तासात १८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे
Ghati Hospital Death
Ghati Hospital DeathEsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या २४ तासात १८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पण, हे १८ रूग्णांचे मृत्यू हलगर्जीपणामुळे झालेले नाहीत. मृतांमध्ये खासगी रूग्णालयातून पाठवलेल्या रूग्णांचा समावेश असल्याची माहिती रूग्णालयाचे डीन संजय राठोड यांच्या वतीने देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

नांदेडमध्ये एका दिवसात २४ रूग्णांचा मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या २४ तासात १८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Ghati Hospital Death
Ghati Hospital Death: राज्यातील सरकारी रुग्णालये व्हेंटिलेटरवर! आता घाटी रुग्णालयात २४ तासांत १० मृत्यूनं खळबळ

काय म्हणालेत रूग्णालयाचे डीन संजय राठोड?

अनेक रूग्ण हे खासगी रूग्णालयातून आलेले असतात. काही रूग्णांची परिस्थिती चिंताजनक असताना ते शासकीय रूग्णालयात दाखल होतात. त्यावेळी आम्ही त्यांच्यावर शक्य ते उपचार करतो. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण हे जास्त आहे. (Marathi Tajya Batmya)

तर नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय रूग्णालयातील मृत्यूची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. संबधित घटनेप्रकरणी केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांनी रूग्णालय प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Ghati Hospital Death
Nanded Hospital Deaths: औषधांचा तुटवडा नाही, एक-एक मृत्यूचा हिशोब देणार; नांदेडच्या घटनेवर मंत्री मुश्रीफांची स्पष्टोक्ती

या घटनेबाबत बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार म्हणाल्या, आज खूप जागरूकता आहे, तरीदेखील उपचारासाठी उशिरा पोहचणं असेल. त्याचबरोबर काही सर्पदंशासारख्या घटना आहेत. अशा अनेक बाबी असतात ज्यामध्ये काही वेळी रूग्णांचा दुर्दैवाने मृत्यू होतो.

यामृत रूग्णांच्या बाबतचा सविस्तर खुलासा मागवला आहे. केंद्र सरकार राज्यांना आरोग्याच्या बाबतीत मदत करण्यासाठी तत्पर आहे. आवश्क ती सर्व मदत केंद्राकडून केली जाईल, असं भारती पवार म्हणाल्या आहेत.(Latest Maharashtra News)

त्याचबरोबर रूग्णालयात औषधांचा तुटवडा नसावा अशी प्राथमिक माहिती असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत. राज्यांना बजेट दिली जातात. राज्याला देखील देण्यात आलं आहे. त्याचबरोबर औषधांचा तुटवडा असल्याची कोणतीही तक्रार आमच्याकडे आली नसल्याचंही भारती पवार म्हणाल्या आहेत.

Ghati Hospital Death
Amol kolhe: 'शरद पवारांना सोडू नका' अमोल कोल्हेंच्या कानात चिमुकल्याची भावनिक साद, नेमकं काय घडलं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.