Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको उड्डाणपुलाजवळ एचपी कंपनीच्या गॅस टँकरला पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास अपघात झाला असून, मोठ्या प्रमाणावर गॅसची गळती सुरू आहे.
अनुचित प्रकार घडू नये म्हणून, पोलिसांनी संपूर्ण परिसर बंद केला आहे. हा गॅस पाच किलोमीटर परिघामध्ये पसरण्याची शक्यता असल्यामुळे लाईट, मोबाईल टाँवर, रस्ते बंद करण्यात आले आहेत. आतापर्यंत 60 ते 70 टँकर पाण्याचा मारा करण्यात आला आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत.
चिकलठाणा एमआयडीसी परिसरात हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचा डेपो असून, या ठिकाणी टँकरने गॅसचा पुरवठा केला जातो. पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास साडे सतरा हजार लिटर गॅस असलेला टँकर या डेपोकडे जात होता.
सिडको उड्डाणपूल सुरू होत असताना चालकाचा ताबा सुटल्याने टँकर उड्डाणपुलाच्या भिंतीवर चढला. त्यात टँकरच्या केबिनचा चक्काचूर झाला. रस्त्याने जाणाऱ्या- येणाऱ्या नागरिकांनी ही माहिती अग्निशमन विभागाला दिली.
अग्निशमन विभागाचे अधिकारी व पोलीस अवघ्या पाच -दहा मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चारही बाजूने रस्ता बंद केला. टँकरमधून मोठ्या प्रमाणावर गॅस गळती होत असल्यामुळे परिसरातील लाईट बंद करण्यात आली.
त्यानंतर व्यावसायिकांना तसेच निवासी नागरिकांना घरात गॅस वापरू नये अशा सूचना करण्यात आल्या. अनुचित प्रकार घडू नये, म्हणून या टँकरवर पाण्याचा मारा केला जात आहे. आत्तापर्यंत 70 टँकर पाण्याचा मारा करण्यात आला आहे.
परिसरातील पाच किलोमीटरपर्यंत हा गॅस पसरण्याची शक्यता असल्यामुळे काळजी घेतली जात आहे. घटनास्थळी पोलीस जिल्हा प्रशासन अग्निशमन विभाग महापालिका आगीच्या प्रसंगी मदत करणारी यंत्रणा दाखल झाली आहे.
अपघातानंतर टँकरच्या तीन पैकी एक वॉल फुटला. त्यामधून गॅस गळती सुरू झाली. गॅसची प्रेशर असल्यामुळे कानठळ्या बसणारा आवाज सुरू झाला. त्यामुळे नागरिकांनी ही माहिती अग्निशमन विभागाला कळवली.
टँकर रिकामा करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून, जळगाव येथून आपत्कालीन मदत वाहन मागवण्यात आले आहे. ते शहरात पोहोचण्यासाठी किमान दोन तासाचा वेळ लागण्याची शक्यता आहे. परिसरातील शाळा, कॉलेज बंद करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.