Manoj Jarange Patil: 'लढेंगे जितेंगे, हम सब जरांगे' महिलांच्या घोषणांनी दणाणले बस स्थानक...!

Maratha Reservation : महिलांनी आपले आगळीवेगळी वेशभूषा परिधान करून या महा शांतता रॅलीमध्ये सहभाग नोंदविला.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil: 'लढेंगे जितेंगे, हम सब जरांगे' महिलांच्या घोषणांनी दणाणले बस स्थानक...!sakal
Updated on

Cha. SambhajiNagar: छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये आज मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महा शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या शांतता रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतला. महिलांचा वाढता सहभाग झाल्यानंतर सिडको बस स्थानक परिसरात महिलांनी एक मराठा, लाख मराठा..! आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे..! अशा विविध घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता.

सिडको बस स्थानक ते क्रांती चौक दरम्यान होणाऱ्या महा शांतता रॅलीमध्ये जिल्हाभरातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने शहरात दाखल होत आहे. सिडको बस स्थानकात जालना रस्त्यावर असणाऱ्या उड्डाणपुलाखाली थांबून मोठा जमाव जमवत होता.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : लाखोंचा जनसमुदाय तर महीलांकडे नेतृत्व, संभाजीनगरात येणार मराठ्यांचं वादळ

या जमावामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. महिलांनी आपले आगळीवेगळी वेशभूषा परिधान करून या महा शांतता रॅलीमध्ये सहभाग नोंदविला.

मा शांतता रॅलीत आलेल्या महिलांनी एक मराठा, लाख मराठा..!, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे..! लढेंगे जितेंगे.. हम सब जरागे...! अशा विविध घोषणा दिल्याने परिसर दणाणून गेला होता. सुमारे तासभर एका पाठोपाठ एक महिलांनी या घोषणा दिल्या.

आज छत्रपती संभाजीनगर शहरात सिडको बस स्थानक ते क्रांती चौक दरम्यान संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीत महिलाचां लक्षणीय सहभाग आहे. त्यामुळे सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे.

- रेखा वाहटूळे,

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : पोलिसांनी थांबवली रॅलीतील बैलगाडी, संतप्त मराठा आंदोलकांची पोलिसांशी हुज्जत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.