Chh. Sambhaji Nagar Crime : मुलगी नको, मला मुलगाच पाहिजे, झोपेतच आवळला गळा...

रमानगर येथे घडली घटना पोलिसांनी केली पतीला अटक
Chh. Sambhaji Nagar Crime
Chh. Sambhaji Nagar Crimesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर: मुलगी नको, मला मुलगाच पाहिजे, असे म्हणत पतीने मध्यरात्री झोपेत पत्नीचा चक्क वायरने गळा आवळला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गळा आवळला जात असताना पत्नीने जोरात हातपाय हलविले.

त्याचवेळेस तिचा पाय बाजूला झोपलेल्या मुलीला लागला. मुलगी जागी झाली असता बापाचे कृत्य बघून तिने प्रसंगावधान राखत चक्क बापाला चावा घेतला. आईची सुटका झाल्याने तिचा जीव वाचला. ही घटना २० जुलैरोजी रमानगरात घडली.

याप्रकरणी आरोपी पतीला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली. भाऊसाहेब सीताराम मगाडे (वय ३०, रा. रमानगर, उस्मानपुरा) असे पतीचे नाव आहे. जखमी पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिला एक दहा वर्षांची तर दुसरी आठ वर्षांची अशा दोन मुली आहेत.

आरोपी पती हा ‘मला मुलगी नको, मुलगाच पाहिजे’ असे म्हणत पत्नीशी नेहमी वाद घालतो. बऱ्याचदा ती निमूटपणे सहन करते, मात्र २० जुलैच्या रात्री त्याने तिला संपवायचेच असे ठरवून तिचा वायरने गळा आवळत ठार मारण्याचा प्रयत्न केला.

नंतर त्याने चाकूचा धाक दाखवत पोलिसांत तक्रार दिल्यास ठार मारून टाकीन अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी पतीला अटक करून न्यायालयात हजर केले असता, २४ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, आरोपी पती भाऊसाहेब याने पत्नीला चार दिवसांपूर्वी म्हणजेच १६ जुलैरोजी पत्नीला बेदम मारहाण केली होती. पत्नी नेहमी मार सहन करते, मात्र त्यादिवशी त्याने केलेली बेदम मारहाण पत्नीला सहन झालीच नाही. जखमी अवस्थेत तिने पोलिस ठाणे गाठत पतीविरोधात पोलिसांत एनसी दाखल केली होती.

Chh. Sambhaji Nagar Crime
Crime News : हडपसरमधील अमोल शेलार टोळीविरुद्ध मोका कायद्यांतर्गत कारवाई

दरम्यान पोलिसांनीही आरोपी पतीला ताब्यात घेत त्याच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यानंतरी त्याच्यात सुधारणा झाली नाही.

लेकीमुळे वाचला आईचा जीव २० जुलैच्या रात्री आरोपीसह फिर्यादी पत्नी, दोन्ही मुली जेवण करून झोपी गेल्या. पतीच्या मनात पत्नीला संपवायचेच हा विचार सुरू होता. मध्यरात्री पत्नी झोपेच्या भरात असताना त्याने टीव्हीच्या केबलने (वायर) तिचा गळा आवळला.

Chh. Sambhaji Nagar Crime
Satara Crime : रात्रीत असं काय घडलं? अख्खं कुटुंबच अंथरुणात मृत्युमुखी पडलं; साताऱ्यात हादरून सोडणारी घटना

झोपेच्या भरात असल्याने अचानक घडलेल्या प्रकारामुळे तिला गळ्याला काहीतरी जाणवले खरे, मात्र तोवर गळा चांगलाच आवळला गेल्याने तिने आपसूकच हातपाय जोरात हलविले. त्याचवेळेस बाजूला झोपलेल्या मोठ्या मुलीला तिची लाथ लागली. दरम्यान, मुलगी विव्हळत उठली असता, ितला बाप आईला काहीतरी करत असल्याचे दिसले.

मुलगी पटकन उठली आणि तिने बापाच्या हाताला जोरदार चावा घेतला, बापाच्या हातातील केबल सुटली अन् तिच्या आईचा जीव वाचला, अशी माहिती पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी सुशील जुमडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.