Aurangabad News | पती-पत्नीचा वाद गेला विकोपाला, एकाने केली आत्महत्या

झाडाला गळफास घेऊन त्याने केली आत्महत्या
Husband suicide
Husband suicideesakal
Updated on

लोहगाव (जि.औरंगाबाद) : पती-पत्नीच्या वादातून पैठण तालुक्यातील ७४ जळगाव येथील सरकारी गायराण जंगलात कमरेच्या पट्ट्याने आठ ते दहा दिवसांपूर्वी झाडाला गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता.सहा) सायंकाळी उघडकीस आली आहे. दीपक भगवान साळुंके (वय ४१, रा.मिलिंदनगर, वार्ड क्रमांक- १७, मेहकर, जि. बुलडाणा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, की लोहगाव- पैठण रस्त्यावरील ७४ जळगाव शिवारातील गट क्रमांक ५४ मधील ३४ एकरक्षेत्रातील सरकारी गायराणात काही तरी सडलेला वास रस्त्याने जाणारे गुराख्यांना आला. त्यानी जंगलात पाहणी केली असता एका झाडाला आठ ते दहा दिवसांपूर्वी कमरेचा पट्ट्याने गळफास घेऊन कुंजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसले. (Husband Committed Suicide In Paithan Taluka Of Aurangabad)

Husband suicide
श्रीलंकेतील आर्थिक संकट थांबता थांबेना, औषधांची मोठ्या प्रमाणावर टंचाई

ही माहिती पोलीस पाटील अनिता बोरूडे-क्षीरसागर यांना मिळताच बिडकीन पोलीस ठाण्यात खबर दिली. सायंकाळी हवालदार सोमनाथ तांगडे, संजुबन कदम, यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पंचनामा करताना त्याच्या खिशाच्या पाकिटात आधार कार्ड व सीमकार्ड सापडले. पंचनाम्यानंतर रात्री उशीरा नानासाहेब क्षीरसागर, सुनिल एरंडे, अशोक घाडगे, गौतम सोनवणे, नारायण सोनवणे, ज्ञानेश्वर जगधणे आदींच्या मदतीने मृतास बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी तात्काळ आधारकार्डच्या आधारे मेहकर पोलीसांच्या मदतीने नातेवाईकाचा शोध घेतला असता सदर मृत वाळुज औद्योगिक वसाहतीत (Waluj MIDC) पत्नीसोबत राहत असल्याचे समजले. (Aurangabad)

Husband suicide
रोहित तू बिनधास्त जा, नितीन गडकरींनी आबांच्या लेकाला दिला शब्द

पती-पत्नीच्या वादातुन तो गेल्या काही दिवसांपासून घरातुन बेपत्ता होता. त्यानेच या गायराणात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. मात्र पोलिसांकडे हरवल्याची नोंद केली नव्हती, अशी माहिती निरीक्षक संतोष माने यांनी दिली. गुरूवारी (ता.सात) बिडकीन ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सोमनाथ तांगडे करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.