Chhatrapati Sambhajinagar : आयबीपीएस संस्थेच्या भविष्यात एकाच दिवशी दोन परीक्षा नको; औरंगाबाद खंडपीठ

संबंधित प्रकरणावर सुनावणी होऊन केवळ परीक्षार्थी उशिरा खंडपीठात आल्याने परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचे सांगितले.
ibps two exam on day mumbai high court aurangabad bench
ibps two exam on day mumbai high court aurangabad benchesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : महापालिका पद भरती आणि वक्फ बोर्डातील पद भरतीसाठी एकाच दिवशी परीक्षा येत असल्याने परीक्षा पुढे ढकलावी, यासाठी तीन परीक्षार्थींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली.

न्या. रवींद्र घुगे व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांच्यापीठाने महापालिका व वक्फ बोर्डाच्या वकिलांना नोटीस बजावून तत्काळ हजर राहण्याच्या सूचना केल्या. संबंधित प्रकरणावर सुनावणी होऊन केवळ परीक्षार्थी उशिरा खंडपीठात आल्याने परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचे सांगितले.

परीक्षा घेणारी संस्था आयबीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन) या संस्थेला अशा प्रकारे एकाच दिवशी परीक्षा भविष्यात घेतल्या जाऊ नये अशी समज दिली. महापालिकेच्या विविध पदांच्या ११४ जागांसाठी राज्यभरातून नऊ हजारांपेक्षा जास्त अर्ज आले.

राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये २८ परीक्षा केंद्रावर सदर परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेची संपूर्ण तयारी झाली. पेपर सेट केला असून, परीक्षा केंद्रावर पोचला आहे.

३ आणि ४ जानेवारी रोजी सकाळी ८.३० ते १०.३० आणि दुपारी १२.३० ते २.३० वाजता परीक्षा होणार असल्याचे महापालिकेच्या वतीने अ‍ॅड. सुहास उरगुंडे यांनी स्पष्ट केले.

वक्फ बोर्डाच्या ६० जागांसाठी राज्यातून ९०२३ अर्ज आले असल्याचे अ‍ॅड. नजम देशमुख यांनी सांगितले. वक्फची भरती प्रक्रिया ४ सप्टेंबरपासून सुरू असून, ९० दिवसांत पूर्ण करण्याचे खंडपीठाचे आदेश असल्याचे निदर्शनास आणून दिले.

खंडपीठाने याचिका निकाली काढली आणि परीक्षा घेणाऱ्या संस्थेस असा प्रकार भविष्यात करू नये अशी समज दिली. दरम्यान, एकाच दिवशी दोन पद भरतीसाठी परीक्षा होत असल्याने कोणतीही एकच परीक्षा देता येणार असल्याने इच्छुकांनी ही याचिका दाखल केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.