औरंगाबाद : शिंदे गटातील पन्नासच्या पन्नास आमदार निवडणूकीत पडतील, असं भाकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. तसेच जर हे सर्व आमदार पडले नाहीत तर मी हिमालयात जाईन, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. (if Fifty MLAs from Shinde group will be elected I will go to Himalayas says Chandrakant Khaire)
"उद्धव ठाकरेंना मुद्दाम त्रास देण्यासाठी दसरा मेळावा घेऊन मोठा खर्च केला जात आहे. बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांनी त्यांना महत्वाची खाती दिली. ज्यांनी मोठं केलं त्यांना आपण विसरायचं नसतं. जनता यांना माफ करणार नाही, त्यामुळं हे पन्नासच्या पन्नास आमदार नाही पडले ना माझं नाव बदलून ठेवा तुम्ही. पन्नासच्या पन्नास लोक नाही पडले तर मी हिमालयात जाईन. कारण हा शाप आहे जगदंबेचा. जनतेला गद्दारी आवडत नाही. आत्तापर्यंत शिवसेनेतून जेवढे निवडून गेले ते कधीही निवडून आले नाहीत" अशा शब्दांत चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.
दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी बस भरुन आणण्यात येणाऱ्या माणसांवर किती खर्च केला जाणार आहे, याचा तपशीलच त्यांनी मांडला. ते म्हणाले, "या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट ५२ कोटी रुपये खर्च करणार असल्याचं खैरे यांनी सांगितलं. प्रत्येक जिल्ह्यासाठी हा खर्च १ कोटी २९ लाख रुपये आहे. त्यामुळं सरासरी ४४ जिल्ह्यांचा एकूण खर्च पाहिला तर ५१ कोटी ८ लाख ४० हजार असा खर्च होतो. पण एकूण खर्च ५२ कोटी रुपयांचा अंदाज आहे. मुख्यमंत्र्यांनी कुठून आणले इतके पैसे असा सवालही त्यांनी विचारला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.