वैजापूर : वाळूमाफियांबरोबरच तालुक्यात आता मुरूम माफियांनी धुमाकूळ घातला आहे. पुनर्वसनासाठी संपादित केलेल्या जमिनीसह सरकारी गायरान जमिनीतून अवैधरीत्या मुरमाची वाहतूक व उत्खनन केल्याप्रकरणी तालुक्यातील बाभुळगावगंगा येथील तब्बल ३९ जणांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आश्चर्य म्हणजे, नोटिसा बजावलेल्यांमध्ये माजी सरपंच, विद्यमान उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मंदिराचा पुजारी, जेसीबी, व ट्रक्टर चालकांचा समावेश आहे.
नांदूरढोक शिवारातील गट नंबर १७, १८ व १९ या सरकारी गायरान जमिनीतून बाभुळगावगंगा शिवारातील गट नंबर ३१, ३२, ३३ व ३५ तसेच गाव पुनर्वसनासाठी संपादित जमिनीतून व नांदूरढोक शिवारातील गट नंबर ८३ मधून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या मुरमाची वाहतूक व उत्खनन करण्यात आले आहे. हे उत्खनन गावातीलच नागरीकांनी केले आहे. याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्याने ३९ जणांना उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहे.
उत्खनन झालेल्या जागेची ईटीएस मोजणी करून या अहवालानुसार आपणास दंड का आकारू नये, याचा खुलासा मागविण्यात आला आहे.
यांना बजावल्या नोटिसा
-उदय कुंजीर, उमाकांत कुंजीर, योगेश घोडे, विजय कुंजीर, राजेंद्र कुंजीर, जालिंदर कुंजीर, शिवाजी कुंजीर, कारभारी बोरगे, भाऊसाहेब बोरगे, योगेश घंगाळे, संतोष घंगाळे, दत्तात्रेय घंगाळे, नाना घंगाळे, रमेश कुंजीर, शरद कुंजीर, सुभाष गायधने, राहुल गायधने, सतीश बोरगे, भाऊसाहेब कुंजीर, किरण कुंजीर, राजेंद्र बोरडे, चंद्रशेखर बोरडे, नारायण घोडे, चंद्रभान कुंजीर, बाबासाहेब कुंजीर, जगदीश जाधव, नाना जाधव, रवींद्र जाधव, गोकूळ वराडे, योगेश बाजारे, दादासाहेब शिंदे, रामभाऊ शिंदे, किसन शिंदे, दिलीप परदेशी, रोहित परदेशी, कैलास परदेशी, शिवाजी बाजारे.
अवैधरीत्या मुरमाची वाहतूक व उत्खनन करण्यात आल्यानंतर अशा लोकांना दंड आकारण्यासाठी नोटिसा बजावल्या असून नोटिसा बजावल्यानंतरही वेळेत जे दंड भरणार नाही, अशा नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे.
— डॉ.अरुण जऱ्हाड
उपविभागीय अधिकारी, वैजापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.