Dharashiv News : जुनी पेन्शन योजना लागू करा, कर्मचारी नागपुरात दाखल

राज्यव्यापी मोर्चा, महसूल कर्मचारी एकवटले
dharashiv
dharashiv sakal
Updated on

धाराशिव : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील महसूल विभागातील ३० ते ३५ कर्मचारी नागपूरला रवाना झाले आहेत. नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारच्या कानावर ही मागणी घालण्यासाठी राज्यातील महसूल कर्मचारी मोर्चासाठी एकवटले आहेत. त्यात सहभागी होण्यासाठी सोमवारी (ता. ११) रात्री हे कर्मचारी रवाना झाले आहेत.

हिमाचल प्रदेशातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही ही योजना लागू करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. त्यासाठी नागपूर येथील विधानभवनावर राज्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन होत आहे.

dharashiv
Dharashiv News : तुळजाभवानी मातेचे धार्मिक विधी कवड्यांची माळ घालूनच !

महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितेश काळे यांच्यासह राजेश भवाळ, विजय पाटील, प्रमोद चंदनशिवे, जगन्नाथ खुने, हरिश्चंद्र मुळे, हरी पवार, दीपक चित्तेवार, महेश क्षीरसागर, अंगद माने, बजरंग केंद्रे आदींसह ३० ते ३५ कर्मचारी रवाना झाले आहेत.

गळवारी (ता. १२) सकाळी नागपूर येथे कर्मचाऱ्यांची ही टीम दाखल झाली आहे. राज्यव्यापी मोर्चात सहभागी झाले आहेत. तिथे माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोर्चाला सामोरे जाऊन, मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.