Detailed Incident of a Missing Girl
छत्रपती संभाजीनगर: माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि महाराष्ट्रातील गायब झालेल्या मुलींसाठी विशेष टास्क फोर्स स्थापण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने विशेष SIT स्थापन करून या मुलींच्या प्रकरणांची सखोल चौकशी करावी आणि न्याय द्यावा. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीला पैसे देत असाल तर महाराष्ट्रातील गायब बहिणीसाठी मोहीम हाती घ्या, असे देखील जलील म्हणाले.
२०२३ मध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील १२८ मुली घरातून गायब झाल्या, तर २०२४ मध्ये याच शहरातील १०६ आणि जिल्ह्यातून १०५ मुली गायब झाल्या आहेत. एक प्रकरण विशेषतः लक्ष वेधून घेणारे आहे, जिथे एक मुलगी १३ मे २०२४ रोजी रेल्वे स्टेशनवर नातेवाईकांना भेटण्यासाठी गेली आणि तिला गोडी गुलाबी पाणी पाजून बेहोश केले. डोळे उघडल्यानंतर ती मुंबईत होती आणि नंतर इंदूर, उजैन आणि मोरका या गावात नेण्यात आली.
मुलीला मोरक्यात दीड लाखात विकले गेले आणि तिला हिंदू रिवाजानुसार जबरदस्तीने लग्न लावण्यात आले. यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर, मिमचे नंदुरबार जिल्हाध्यक्षा यांनी इम्तियाज जलील यांना संपर्क साधला. त्यांनी यावर त्वरित कारवाई केली आणि मुलीच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले. पोलिसात आई-वडिलांनी तक्रार केली नाही कारण ते आर्थिकदृष्ट्या गरीब होते. विकणारे जोडपे पुण्याचे असल्याचे समोर आले आहे.
यावेळी इम्तियाज जलील यांनी अपील केले की, अशा अनेक मुली आहेत ज्या गायब झाल्या आहेत. समाजातील सर्वांनी एकत्र येऊन मोहीम सुरू करावी आणि त्या मुलींचा शोध घेण्याचे काम सुरू करावे. २७ जुलै रोजी, गायब झालेली मुलगी परत संभाजीनगरला आली आहे, परंतु अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.