जनतेला घाबरवण्याचा प्रयत्न करु नका, जलील यांचा अधिकाऱ्यांना सल्ला

इम्तियाज जलील
इम्तियाज जलील
Updated on
Summary

आस्तिककुमार पांडेय साहेब तुम्ही तर स्वतःची फौज तयार केली आहे. औरंगाबादेत तीन-तीन कमिश्नर फिरतात. छोटे- छोटे दुकानदार तुम्हाला सहज दिसतात. दारु विकणाऱ्यांना मोकळे रान सोडले आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील तमाम जनतेचे आभार मानतो. याच दिवशी तुम्ही मला निवडून दिले होते, अशी कृतज्ञतेची भावना खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी व्यक्त केली. आज रविवारी (ता.२३) फेसबुकवरुन (Facebook Live) त्यांनी जनतेशी संवाद साधला. श्री.जलील म्हणाले, या देशात हिटलरशाही नाही, तर लोकशाही आहे. जनता सुप्रीम आहे. कोणी आमदार, खासदार, अधिकारी नाही. जनता सर्वांत सुप्रीम आहे. रस्त्यावर संकटात सोडून द्याल. आणि केवळ स्वतःच्या अधिकारांचा वापर करुन त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करणे, मुळात जनता अगोदरच अडचणीत आहे. हे योग्य नाही. औरंगाबादमधील जितके अधिकारी आहेत ते रस्त्यावर जास्त दिसत आहेत. त्यांचे अभिनंदन करतो. आजच्या वर्तमानपत्रात एक बातमी आली आहे, की एका रिक्षावाल्याने आत्महत्या केली आहे. त्याची बातमी छोटीशी येते. कारण तो गरीब माणूस आहे. रिक्षावाला आहे.

इम्तियाज जलील
कब्रस्तान अन् शेतजमिनीचा वाद मिटला, पोलिसांनी घेतला पुढाकार

गुंडांची नेमणूक

खासगी, बँकांकडून कर्ज वसूलीसाठी खासगी गुंडांची रिकव्हरी एजंट्स म्हणून नेमणूक केली आहे. ते कर्जाचे हप्ते न भरणाऱ्या लोकांची वाहने जबरदस्तीने उचलून आणत आहेत.

तुम्हाला मिठाई कोणी दिली?

आस्तिककुमार पांडेय (Astik Kumar Pandey) साहेब तुम्ही तर स्वतःची फौज तयार केली आहे. औरंगाबादेत तीन-तीन कमिश्नर फिरतात. छोटे- छोटे दुकानदार तुम्हाला सहज दिसतात. दारु विकणाऱ्यांना मोकळे रान सोडले आहे. जे छोटे कारागीर पैसासाठी बाहेर पडतात. त्यांच्यावर कारवाई करता. मिलन मिठाई दुकानाला दोन वाजता सील केले जाते. आणि चार वाजता मिठाई दुकान उघडले जाते. त्याला कशी परवानगी मिळते, असा प्रश्न श्री. जलील यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan), महापालिका (Aurangabad Municipal Corporation) प्रशासक आस्तिककुमार पांडेय आणि पोलिस आयुक्त निखिल गुप्ता (Aurangabad Police Commissioner Nikhil Gupta) यांना विचारला. पोलिस कमिशनरांना मी विचारतो की तुमच्या पोलिसांकडून कुठून पैसे जमा केले जातात. छोटे-छोटे दुकानदारांना का बंद ठेवले जात आहेत. यातून अधिकाऱ्यांना स्वतःचे अधिकारीपण दाखवायचे आहे, असा आरोप त्यांनी केला. कलेक्टरसाहेब तुम्ही सांगा. सील लावले असताना मिलन मिठाई हे दुकान कसे उघडले जाते. तुम्हाला मिठाई कोणी दिली, असा टोला खासदार जलील यांनी लगावला.

बैठकीवर बहिष्कार

उद्या सोमवारी (ता.२४) लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या बैठकीवर श्री जलील यांनी बहिष्कार टाकला आहे. बैठकीत केवळ अधिकारी वर्ग स्वतःची पाठ थोपवून घेत असेल तर ते मला नामंजूर आहे. त्याउलट आत्महत्या केलेल्या रिक्षावाल्याच्या कुटुंबीयाची भेट घेणार असल्याचे त्यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.