बांधावर जाऊन जलीलांनी अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांशी साधला संवाद

ढोरेगाव (ता.गंगापूर, जि.औरंगाबाद) : खासदार इम्तियाज जलील यांनी पाहणी करून शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली.
ढोरेगाव (ता.गंगापूर, जि.औरंगाबाद) : खासदार इम्तियाज जलील यांनी पाहणी करून शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली.
Updated on

कायगाव (जि.औरंगाबाद) : अतिवृष्टीने आणि शिवना नदीच्या महापुराने नुकसान झालेल्या शेती पिकांची, फुटून गेलेल्या कोल्हापूरी बंधाऱ्यांच्या नुकसानीचा पाहणी दौरा करून या विषयी आज दुपारी दोन तीन दरम्यान गंगापूर तहसिल कार्यालयात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन नुकसान माहीती अहवाल जाणून घेणार आहे.या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपासून एक ही शेतकरी वंचित राहणार नाही. याची दक्षता काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला करणार आहे, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी ढोरेगाव (ता.गंगापूर) येथे नुकसान पाहणी दौऱ्या दरम्यान दिली. गंगापूर तालुक्यात अतिवृष्टी व शिवना नदीच्या महापुरामुळे शेती पिकाचे (Heavy Rain Hit Gangapur) आणि नागरिकांच्या घरांचे पडझडीने मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणची कोल्हापुरी बंधारे फुटले या नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करण्यासाठी खासदार इम्तियाज जलील हे गुरुवारी (ता.23) सकाळी अकरा वाजता गंगापूर (Gangapur) तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करण्यात आले होते. प्रथम ढोरेगाव येथे आले होते. त्यानंतर भाळगाव, मेंढी, झोडेगाव येथे अतिवृष्टीने बाधित झालेल्या भागाची पाहणी (Aurangabad) केली. यावेळी नुकसानग्रस्त शेत बांधावर जाऊन त्यांनी पाहणी केली. त्यावेळी ते शेतकऱ्यांशी संवाद साधतांना बोलत होते. यावेळी बिलाल इम्तियाज जलील, तालुकाध्यक्ष राहुल वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ढोरेगाव (ता.गंगापूर, जि.औरंगाबाद) : खासदार इम्तियाज जलील यांनी पाहणी करून शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली.
मोठी कारवाई! हिंगोली जिल्ह्यात २० लाखांचा गुटखा जप्त

मंगळवारी(ता.7) सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीने शेतशीवार झोडपून काढले. वादळी वाऱ्याने उभे उसाचे पीक जमीनदोस्त केले.अनेक ठिकाणी सखल भागातील कपाशी, सोयाबीन, तूर, मका पिकात पावसाचे पाणी साचून पिकांची मोठी नुकसान झाली. तर शिवना नदीच्या महापुरामुळे नदी काठवरील शेत जमिनीची सुपीक माती खरडून गेली. विहिरी खचल्या, अनेक कोल्हापूरी बंधारे ,शेततळी फुटली. त्यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. शिवना नदी काठावरील शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या हजारो हेक्टरवरील शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तसेच सोलेगाव येथील काही नागरिकांच्या घरात पुराचे व पावसाचे पाणी शिरून मोठे नुकसान झाले. यामुळे 31 पूरग्रस्त कुटुंबाना ग्रामपंचायतने सुरक्षितस्थळी स्थलांतरीत केले होते. गुरुवारी सकाळी खासदार जलील यांनी या नुकसानग्रस्त शेती बांधावर जाऊन शेतकरी, नागरिकांशी संवाद साधून त्यांच्याकडून नुकसानीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर संबंधित यंत्रणेला तातडीने पीक नुकसानीचे फेर पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यावेळी शहराध्यक्ष फैसल बासोलान, तालुका प्रसिद्धीप्रमुख जुबेर पठाण, तालुका संघटक वैभव खाजेकर, युवा शहराध्यक्ष नदीम खान, सरोवर जहूरी, जुबेर सिद्दीकी, सलमान बासोलान, फैजल शेख, करीम पटेल, आयुब पटेल, लियाकत पटेल यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()