कोव्हॅक्सिन लसींचा घोळ, औरंगाबाद महापालिकेच्या नोटिसा

कोविशिल्ड लस
कोविशिल्ड लस
Updated on
Summary

महापालिकेला शासनाकडून दोन लाख ७६ हजार कोविशिल्ड तर ३२ हजार कोव्हक्सीन लसींचा साठा मिळाला.

औरंगाबाद : लसींचा (vaccines) तुटवडा जाणवत असताना महापालिकेला खासगी रुग्णालयांना दिलेल्या कोव्हॅक्सिन लसींचा (covaxin vaccines) हिशेब लागत नसल्याचे समोर आले आहे. शासनाकडून मिळालेल्या या लसी सुरुवातीला महापालिकेने खासगी रुग्णालयांना दिल्या होत्या पण त्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने या रुग्णालयांना नोटिसा बजावल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. (In Aurangabad, it has come to light that there is no counting of covaxin vaccines)

कोविशिल्ड लस
जून अखेरीस होणार औरंगाबाद विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ

महापालिकेला शासनाकडून दोन लाख ७६ हजार कोविशिल्ड तर ३२ हजार कोव्हक्सीन लसींचा साठा मिळाला. यातील १२ हजार लसी खासगी रुग्णालयांना देण्यात आल्या होत्या. पण खासगी रुग्णालयास नेमक्या किती लस दिल्या आहेत. त्यांची नोंद ऑनलाईनमध्ये आढळून येत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत समोर आले. त्यानंतर महापालिकेने ज्या खासगी रुग्णालयास लस वितरित केल्या होत्या त्यांच्याकडून ऑनलाईन आणि ऑनलाईन दिलेल्या लसींची माहिती मागवली आहे.

कोविशिल्ड लस
औरंगाबाद जिल्ह्यात पाच वर्षांत आठशेवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या

महापालिकेने खासगी ३२ रुग्णालयांना कोव्हॅक्सीनच्या १२ हजार लसी दिल्या आहेत. यातील काही रुग्णालयांनी लसीकरणाची आकडेवारी दिलेली नाही. मार्च महिन्यात अ‍ॅप अपडेट करताना काही दिवस लसीकरणाची नोंद झाली नाही. त्यामुळे देशभर अडचण निर्माण झाली होती. यावेळी ऑफलाइन लसीकरण करण्यात आले. त्यामुळे लसींचा घोळ आल्याचे सूत्रांनी सांगितले.

(In Aurangabad, it has come to light that there is no counting of covaxin vaccines)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.