औरंगाबाद : कोविड सेंटरमध्येच ऑक्सिजनची सुविधा; महापालिकेची तयारी वेगाने

आवश्‍यक औषधी साठा खरेदी करणे तसेच मनुष्यबळाची भरती केली जाणार
oxgyen
oxgyen sakal
Updated on
Summary

आवश्‍यक औषधी साठा खरेदी करणे तसेच मनुष्यबळाची भरती केली जाणार

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या तिसरी लाटेच्या(corona third wave) अनुषंगाने महापालिकेच्या आरोग्य विभागाने जोरदार तयारी सुरू केली आहे. दुसऱ्या लाटेत कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनची(oxgyen) सुविधा नसल्याने रुग्ण गंभीर होताच त्याला ऑक्सिजन उपलब्ध असलेल्या ठिकाणी शिफ्ट करावे लागत होते. हा अनुभव पाहता आता कोविड केअर सेंटरमध्येच(covid care center) रुग्णांसाठी ऑक्सिजनची व्यवस्था केली जाणार असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.शहरात गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत तिप्पट रुग्ण आढळून येतील, असा अंदाज बांधला जात असल्याने महापालिकेने त्याअनुषंगाने तयारी सुरू केली आहे. कोविड केअर सेंटर सुरू करणे, आवश्‍यक औषधी साठा खरेदी करणे तसेच मनुष्यबळाची भरती केली जाणार आहे.

oxgyen
औरंगाबाद : साडेपाचशेवर शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्रांची होणार पडताळणी

त्याचबरोबर रुग्णांना उपचार सुविधा पुरविण्यासाठी व्यवस्थाही उभारली जात आहे. ऑक्सिजनची गरज लक्षात घेता मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरमध्ये २० किलो लिटरचा लिक्वीड ऑक्सिजनचा प्लांन्ट उभारण्यात आला आहे. त्याची चाचणी घेण्यात आली. याठिकाणी साडेतीनशे बेडसाठी ऑक्सिजन उपलब्ध आहे. तसेच महापालिकेच्या नेहरुनगर, सिडको एन-८, एन-११, इओसी पदमपूरा या चार आरोग्य केंद्रात ऑक्सिजन लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. या चारही ठिकाणी ऑक्सिजनचे पीएसए प्लांन्ट उभारले जातील, असे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले. शहरात पहिल्या टप्प्यात चार कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार आहेत. याठिकाणी येणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासल्यास त्यांना तातडीने ऑक्सिजन पुरविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. महापालिकेकडे २५४ ऑक्सिजन कॉन्सट्रेटर असून ७६८ जम्बो सिलिंडर आहेत. प्रत्येक कोविड सेंटरमध्ये साधारणपणे २० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर लावण्यात येतील, असे डॉ. मंडलेचा म्हणाले.

वॉररुमधून डॉक्टर ठेवणार प्रकृतीवर लक्ष

रुग्णसंख्या झपाट्याने वाढण्याचा अंदाज असल्याने पुन्हा वॉररुम सुरू केली जाणार आहे. यापूर्वी वॉर रुममधून डाटा एन्ट्री ऑपरेटर होम आयसोलेशनमधील रुग्णांना फोन करून प्रकृतीवर लक्ष ठेवत असत. मात्र आता वॉररुमध्ये दहा डॉक्टरांची नियुक्ती केली जाईल. हे डॉक्टर वॉररुममधून दिवसातून दोनदा रुग्णांशी संपर्क साधून त्यांची विचारपूस करतील. गरज भासल्यास रुग्णांना कुठे हलवायचे याबाबतही निर्णय घेतला जाईल. वॉर रुमला नागरिकांना किंवा रुग्णांना संपर्क साधता येईल, यासाठी चार ते पाच फोन नंबर दिले जातील, असे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

oxgyen
औरंगाबाद : कोरोनाबाधित तिप्पटीने वाढण्याची शक्यता

३५.९६ मेट्रीक टन ऑक्सिजनची क्षमता

डॉ. पारस मंडलेचा यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार महापालिकेकडे ३५.९६ मेट्रिक टन ऑक्सिजनची क्षमता आहे. महापालिका व खासगी रुग्णालये मिळून ८९.६९ मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता उपलब्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यात (घाटी रुग्णालय, मिनी घाटी रुग्णालय, महापालिका व खासगी रुग्णालये) २१५.६८ मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता आहे.

oxgyen
औरंगाबादमध्ये हुरडा पार्ट्यांवर बंदी; पाहा व्हिडिओ

शहरात अशी आहे बेड‍ची उपलब्धता

  1. कोविड बेडस् (मोठ्यांसाठी)

  2. एकूण कोविड बेडस् - ६७५४ व्हेंटिलेटर बेडस् ः २७८

  3. आयसीयू बेडस् - ६०० ऑक्सिजन बेडस् ः २०८९

  4. आयसोलेशन बेडस् - ३७८७

कोविड बेडस् (लहान मुलांसाठी)

  1. एकूण कोविड बेडस् - ११०३ व्हेंटिेलटर बेडस् ः ४०

  2. आयसीयू बेडस् - ८८ ऑक्सिजन बेडस् ः ४३९

  3. आयसोलेशन बेडस् - ५४०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()