Sambhaji Nagar News : चिकलठाणा, वाळूजमध्ये लघुउद्योजकांना लवकरच हक्काचे गाळे

चिकलठाणा, वाळूजमध्ये बांधकामाची अखेर निविदा
sambhaji nagar
sambhaji nagar Sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : वाळूज आणि चिकलठाणा परिसरात नव्या उद्योजकांसाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे अतिरिक्त एमआयडीसीची मागणी अनेक वर्षांपासून उद्योजकांकडून केली जात आहे. त्यानुसार एमआयडीसीतर्फे अतिरिक्त शेंद्रा (जयपूर) आणि सटाणा येथे जमिनीची मोजणी सुरू आहे. दुसरीकडे चिकलठाणा आणि वाळूज येथील गाळे उद्योजकांना द्यावेत, अशी मागणीही होती. अखेर त्यास यश आले. दोन्ही एमआयडीसीतील ५९ गाळ्यांच्या बांधकामाची निविदा काढण्यात आली आहे. यामुळे भाडेतत्त्वावर जागा घेऊन उद्योग थाटणाऱ्यांना गाळे मिळणार आहेत.

दोन्ही एमआयडीसीत अनेक लघुउद्योजकांचे स्वतःचे गाळे नाहीत. भाडेतत्त्वावरील जागेवरच त्यांना उद्योग सुरू करावा लागला. नव्या उद्योजकांनाही हीच अडचण आहे. यासंदर्भात तत्कालीन मसिआचे अध्यक्ष किरण जगताप यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे चिकलठाण्यात २१ गाळे आणि वाळूज एमआयडीसीतील ३८ गाळे उद्योजकांना देण्यास सरकार तयार झाले आहे. त्यात शंभर मीटरचे बांधकाम असेल. अमृत लघुउद्योजक योजनेच्या माध्यमातून हे गाळे उद्योजकांना दिले जाणार आहेत.

वाळूज आणि चिकलठाणा येथे भाडेतत्त्वावर जागा घेऊन लघुउद्योग करणाऱ्या उद्योजकांसाठी १०० मीटरच्या गाळ्यांच्या मागणीसाठी आम्ही एमआयडीसी आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले. त्यामुळे उद्योजकांना हक्काचे गाळे मिळतील.

— किरण जगताप, माजी अध्यक्ष, मसिआ

चिकलठाणा आणि वाळूज येथील ५९ गाळ्यांच्या बांधकामासाठीची निविदा निघाली आहे. यात चिकलठाणा येथील निविदा ६ कोटी, १८ लाख तर वाळूजची १० कोटी ४० लाख रुपयांची निविदा निघाली आहे. यामुळे लघुउद्योजकांना गाळे मिळतील.

— रमेशचंद्र गिरी, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.