Sambhaji Nagar : घाटी रुग्णालयात आता दुचाकी, रुग्णवाहिका वाहनतळात ; वाहनतळ करण्याचा निर्णय घाटी प्रशासनाने घेतला

वाहतुकीला येणारे अडथळे दूर करण्यासाठी अधिष्ठातांचा निर्णय
sambhaji nagar
sambhaji nagar sakal
Updated on

घाटी परिसर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) अगदी प्रवेशद्वारापासूनच ठीक-ठिकाणी रस्त्यातच दुचाकी, इतर वाहने उभी केलेली असतात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर बाह्य रुग्ण विभागासमोरील मैदानात वाहनतळ करण्याचा निर्णय घाटी प्रशासनाने घेतला. आता दुचाकी, रुग्णवाहिकाही या वाहनतळातच लावाव्या लागणार आहेत.

१ हजार १७७ खाटा मंजूर असलेल्या घाटी रुग्णालयात एवढे रुग्ण दाखल असतात. बाह्य रुग्ण विभागातही रोज किमान सतराशे रुग्णांची नोंद होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण आणि नातेवाईक येत असल्याने त्यांच्याद्वारे आणली जाणारी वाहने मग दुचाकी असो की इतर वाहने ही बहुतांश वेळा रस्त्यातच लावलेली आढळून येतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.

हे चित्र बदलण्यासाठी बाह्य रुग्ण विभागासमोरील मैदानातच सर्व वाहने उभी केली जातील. यात रुग्णवाहिकांचाही सामावेश आहे. मैदान व्यवस्थित केल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. वाहनतळाच्या पुढे केवळ रुग्णाचे वाहनच सोडण्यात येईल, असेही घाटी प्रशासनाने स्पष्ट केले.

किमान दोनशे वाहनांची व्यवस्था

या वाहन तळाला दोन गेट असणार आहेत. एक आत प्रवेश करण्यासाठी तर दुसरा बाहेर जाण्यासाठी असेल. झुणका भाकर केंद्राच्या बाजूने वाहन लावण्यासाठी आत येता येईल आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडण्यासाठी रस्ता असेल.

सध्या शुल्क नाहीच

चार वर्षांपूर्वी असेच पार्किंगचे टेंडर काढण्यात आले होते. त्यातून वर्षाला ३० ते ३५ लाख रुपये मिळत. नाममात्र शुल्क ठेवल्यास एखाद्या संस्थेची येथे नेमणूक करता येईल. वाहनाची जबाबदारीही या संस्थेची राहील. यात अभ्यागत समिती, डॉक्टरांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. सध्या मात्र वाहने लावण्यासाठी शुल्क आकारले जाणार नाही.

sambhaji nagar
Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरच्या फारोळा जलशुद्धीकरण केंद्रामध्ये बिघाड;तीन तास बंद पडला पाणीउपसा

रुग्णवाहिकाही वाहनतळात

दोन ते तीन रुग्णवाहिकाच अपघात विभाग, शवविच्छेदन विभाग, मेडिसिन बिल्डिंग येथे उभा राहतील. उर्वरित सर्व रुग्णवाहिकांना वाहनतळातच एका बाजूला जागा देण्यात येईल. यामुळे वाहनधारकांनाही शिस्त लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.