Sambhaji Nagar Crime News : घरफोडीत आठ लाखांचा ऐवज लंपास ; चोरटे दुचाकी तसेच चोरी करण्याचे साहित्य सोडून पसार

घरफोडीच्या विविध दोन घटनांमध्ये चोरट्यांनी पावणेआठ लाखांचा ऐवज लंपास केला. एन ११ आणि शहानूरवाडी भागात हे प्रकार घडले.
sambhaji nagar
sambhaji nagar sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : घरफोडीच्या विविध दोन घटनांमध्ये चोरट्यांनी पावणेआठ लाखांचा ऐवज लंपास केला. एन ११ आणि शहानूरवाडी भागात हे प्रकार घडले. याप्रकरणी सिडको आणि जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच उस्मानपुरा भागात चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्याची चाहूल लागल्याने चोरटे दुचाकी तसेच चोरी करण्याचे साहित्य सोडून पसार झाले. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरीची पहिली घटना १० जानेवारीला सकाळी एन-११ भागातील कोंडीराम गणपतराव भाले यांच्या घरी घडली. चोरट्यांनी या घटनेत रोख ७० हजार रुपये आणि सोन्याच्या अंगठ्या असा १ लाख २० हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी भाले यांच्या तक्रारीवरुन दोन संशयित महिला तसेच रत्नशील गायकवाड (रा. उदगीर) यांच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पीएसआय मोरे तपास करीत आहेत.

घरफोडीची दुसरी घटना १७ जानेवारीला मयूरेश्वर अपार्टमेंट, गादिया विहार, शहानूरवाडी येथे घडली. याप्रकरणी राजू बन्सी हिवराळे (वय ४७) यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेत चोरट्यांनी सोन्याचा नेकलेस, गंठण, मंगळसूत्र, पैंजण आदी ६ लाख ६३ हजारांचा ऐवज लंपास केला. दरवाजाच्या कोंड्याचे स्क्रू उघडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पीएसआय राऊत तपास करीत आहे.

sambhaji nagar
Sambhaji Nagar : मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावे ; खेडेकर

कोण आहे रे तिकडे? विचारताच पळाले

उस्मानपुरा भागातील भीमपुरा येथे नितीन नागसेन वाघ (वय ४२) यांच्या घरी चोरीचा प्रयत्न फसला. १७ जानेवारीला रात्री पावणेबारा वाजता हा प्रकार घडला. वाघ हे घराखाली मेसमध्ये बसलेले होते. यावेळी त्यांना चॅनल गेटचे कुलूप कोणीतरी तोडत असल्याचा आवाज आला. वाघ यांनी कोण आहे रे तिकडे? अशी विचारणा केली असता चोरटे पसार झाले.

चोरट्यांनी यावेळी त्यांची दुचाकी तसेच हातोडी, टॉमी, पकड, मोबाइल, कुलुपाच्या चार चाव्या आदी साहित्य असलेली पिशवी सोडून पसार झाले. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जमादार जाधव तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.