Chhatrapati Sambhajinagar : संडे हो या मंडे, पोषण आहारात नको अंडे

पौष्टिक लाडूचा पर्याय ः शासन निर्णयाला जैन, हिंदुत्ववादी संघटनांचा तीव्र विरोध
in school food nutrition there is no need of eggs these organizations against
in school food nutrition there is no need of eggs these organizations againstesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय मध्यान्ह भोजनामध्ये अंडी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पण त्याला अखिल भारतीय पुरोहित संघटना, जैन, ब्राह्मण, बजरंग दल,

मारवाडी समाजासह विविध संघटनांनी विरोध केला आहे. अंड्याला पर्याय म्हणून सोया पदार्थ, उडीद, गूळ-शेंगदाण्याचे लाडू पर्याय आहेत. त्यामुळे अंडी देण्याचा निर्णय शासनाने मागे घ्यावा, यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांना निवेदन दिले जाणार आहे.

सरकारी शाळांमध्ये शालेय पोषण आहारात अंडी आणि केळीचा समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत. प्रत्येक बुधवारी किंवा शुक्रवारी विद्यार्थ्यांना उकडलेली अंडी देण्यात यावीत अथवा अंडा पुलाव, बिर्याणी देण्यात यावीत.

जे विद्यार्थी अंडी खात नाहीत, त्यांना पर्याय म्हणून केळी देण्यात यावी, असे शासन आदेशात नमूद आहे. मात्र, या निर्णयाला सर्वत्र विरोध होत आहे. काही ठिकाणी मोर्चे देखील काढले जात आहेत. हा निर्णय मागे घ्यावा,

अशी मागणी अखिल भारतीय पुरोहित महासंघ, बजरंग दल, ब्राह्मण संघटना, जैन, मारवाडी समाजाने केली आहे. अंड्याला सोया पदार्थ, उडीद, गूळ-शेंगदाण्याचा लाडू, सुकामेवा असे पर्याय सुचवले आहेत.

अंड्यापेक्षा मूग, उडीद बरे

डॉ. विकास राहाणे (आयुर्वेद चिकित्सक)

आयुर्वेदानुसार अंडी रक्तदृष्टी करणारी असतात. अंड्यातील बलक हा एक गर्भ आहे आणि तो अपक्व असतो. अपक्व पदार्थ खाल्ल्यामुळे रक्तदृष्टी होऊन पित्त विकार, रक्त विकार हे आजार होतात. फक्त प्रोटीन म्हणून सरकार याचा विचार करत असेल तर त्यापेक्षा चांगले प्रोटिन्स मुग आणि उडीदामध्ये आहेत.

अंडी हे ‘गुड फूड’

डॉ. मंदार देशपांडे (ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ)

एका अंड्यापासून साधारणपणे सहा ग्रॅम प्रथिने मिळतात, इतर पदार्थांपेक्षा ते जास्त आहेत. तसेच कॅलरीजही मिळतात. यातून मुलांच्या वाढीला मदत होते. अंडे हे ‘गुड फूड’ म्हणता येईल. लवकर उकळण्यास तसेच पचनासही अंडे सोपे आहे. असे असले तरी डाळी, कडधान्ये, चीज, पनीर यातही प्रथिने असतात. यातूनही मुलांच्या वाढीसाठी मोठी मदत होते.

भावना दुखावणारा निर्णय

आनंद पांडव (जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय पुरोहित महासंघ)

शासनाने शालेय पोषण आहारात अंडी देण्याचा निर्णय हा शाकाहारी विद्यार्थ्यांच्या भावना दुखविणारा आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात आम्ही आहोत.

अध्यादेश रद्द करावा

अर्जुनसिंग डहाळे (जिल्हाध्यक्ष, बजरंग दल)

शालेय पोषण आहारात अंडी देण्याचा शासनाने घेतलेला निर्णय मागे घेण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी संबंधित अध्यादेश रद्द करण्याची मागणी शासनाकडे करणार आहोत.

अंड्यांमध्ये पौष्टिक घटक

भाऊसाहेब देशपांडे (शालेय पोषण आहार अधिक्षक)

अंड्यामध्ये प्रोटिन्स, अ जीवनसत्त्व, ड जीवनसत्त्व, व्हिटॅमिन बी-२, व्हिटॅमिन बी-१२ आणि शरीराला आवश्यक इतर पौष्टिक घटक असतात.

असे आहेत आक्षेप

  • यासंदर्भात दिलेल्या निवेदनात, अंडे मांसाहारी पदार्थ आहे. सार्वजनिक व बाल विद्यार्थ्यांशी निगडित योजनेमध्ये याचा अंतर्भाव करणे म्हणजे शाकाहारी हिंदूंच्या व समविचारी जैन, वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेवर आघात आहे.

  • शालेय पोषण आहारातील मूळ तत्त्व समानता, एकत्रित भोजन, भेदभाव न करणे हे आहे. शाळेत काहीजण केळी आणि काहीजण अंडी खाणार, यामुळे भेदभाव निर्माण होईल.

  • एकाच ठिकाणी शाकाहारी शालेय पोषण आहार व त्याच स्वयंपाकगृहातून अंड्याचे प्रकार तयार केले जातील. त्यामुळे शाकाहारी मुले शालेय पोषण आहारापासून दूर जातील.

  • कुक्कुटपालन केंद्रावर अँटिबायोटिकचा अतिरिक्त होणारा वापर व तो अंड्यामार्फत माणसापर्यंत पोचल्यानंतर त्याचे होणारे दुष्परिणाम यामुळे धोका असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.