तीन वर्षांत लिंग गुणोत्तरात आठची घट, पुरोगामी महाराष्ट्रातील चित्र, मुलगी अजूनही नकोशी

वर्ष २०११ च्या जनगणना अहवालानुसार भारतात १००० पुरुषांमागे ९४० स्त्रिया आहेत म्हणजेच लिंग गुणोत्तर ९४० आहे.
Sex Ratio
Sex Ratioesakal
Updated on

कळ्यांना गर्भातच खुडण्याचे प्रमाण अद्यापही कमी नाही. मुलींची संख्या कमी झाल्याने अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या. त्यातून समाज धडा घ्यायला तयार नाही. आजही मुलगाच हवा हा अनेकांचा अट्टाहास कायम आहे. त्यामुळे देशात मागील काही वर्षात मुलींची घटणारी संख्या चिंतेची बाब झाली. महाराष्ट्रातही हीच स्थिती असून, २०२०-२१ मध्ये एक हजार मुलांमागे ९४० असलेली मुलींची संख्या वर्ष २०२२-२३ मध्ये घटून ९३२ वर आली. वर्ष २०२१-२२ मध्ये ही संख्या ९३३ होती. मागील तीन वर्षांत महाराष्ट्रात लिंग गुणोत्तरात सरासरी आठने घट झाली.

दर हजार पुरुषांमागे लोकसंख्येत असलेल्या स्त्रियांच्या प्रमाणाला लिंग गुणोत्तर म्हटले जाते. वर्ष २०११ च्या जनगणना अहवालानुसार भारतात १००० पुरुषांमागे ९४० स्त्रिया आहेत म्हणजेच लिंग गुणोत्तर ९४० आहे. मात्र, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मागील काही वर्षांत बेकायदेशीररीत्या लिंग निदानाचे प्रमाण वाढले.

त्यामुळे ‘मुलगाच हवा’ या मानसिकतेमुळे मुलीचा गर्भ खुडला जातो; तसेच ‘हम दो हमारे दो’, ‘हम दो हमारा एक’, लहान कुटुंब या संस्कृतीत मुलगा हवाच अशी अनेकांची मानसिकता झालेली असते. याचा परिणाम लिंग गुणोत्तरावर झालेला दिसतो. देशात अनेक राज्यांत असमतोल लिंग गुणोत्तर असल्याने तेथे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या. लिंग गुणोत्तराचे प्रमाण अशाच प्रकारे घटत राहिल्यास यात समाजाची समतोल बिघडू शकतो.

आकडे सामाजिक समस्या निर्माण करणारे

वर्ष २०२०-२१ च्या तुलनेत देशात २०२२-२३ या वर्षात बिहार, छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मिझोराम, नागालँड, पश्‍चिम बंगाल या राज्यांत मुलींची संख्या घटली आहे. लडाख या केंद्रशासित प्रदेशात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या जास्त आहे. येथे वर्ष २०२२-२३ मध्ये येथील लिंग गुणोत्तर एक हजार मुलांमागे १ हजार २३ मुली असे आहे. सध्या मुलींची संख्या कमी असल्याने अनेक तरुणांचे विवाह होत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.