छत्रपती संभाजीनगर : ध्येय गाठण्यासाठी कोणतीही परिस्थिती अडचण ठरत नाही. इच्छाशक्ती आणि अविरत प्रयत्न केले तर अशक्य काहीच नसते. हेच दाखवून दिले आहे छत्रपती संभाजीनगरातील एका झोपडपट्टीत राहणाऱ्या तृप्ती मिलिंद मगरे या जिद्दी मुलीने.
ऑटोरिक्षाचालक वडिलांनी तिच्या स्वप्नांच्या आपली आर्थिक परिस्थिती कधी आड येऊ दिली नाही आणि तिनेही जिद्दीने अभ्यास केला. ती नुकतीच ‘एमबीबीएस’ झाली. शहरातील एका वसाहतीमध्ये लहानाची मोठी झालेल्या तृप्तीचे वडील रिक्षाचालक तर आई गृहिणी.
यामुळे साहजिकच घरची परिस्थिती बेताचीच. आजूबाजूला शैक्षणिक वातावरण नाही. शाळेतील शिक्षकांनी प्रोत्साहन दिल्याने ती वक्तृत्व स्पर्धात सहभागी होऊ लागली. या स्पर्धांची तयारी करण्यासाठी तिने अनेक महापुरुषांची पुस्तके वाचली.
तिला लहानपणापासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षातून प्रेरणा मिळाली. तिने अधिकारी होण्याचे ठरवले. पहिली ते दहावीपर्यंत चांगले गुण मिळवत तिने हीच परंपरा कायम ठेवली. त्यानंतर ती ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण झाली.
आई-वडिलांची इच्छा पूर्ण
‘नीट’नंतर तृप्तीचा छत्रपती संभाजीनगरातीलच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश झाला. १५० विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात प्रवेश घेतला होता, यातील अनेकजण सधन कुटुंबातील होते. मात्र, तृप्तीला शिक्षणाच्या साहित्यासाठी घरी पैसे मागवण्यासाठी अनेक वेळा विचार करावा लागायचा, असे ती सांगते.
नुकतीच तृप्तीला एमबीबीएसची पदवी मिळाली. आता आई-वडिलांची इच्छा पूर्ण झाल्याचे तृप्तीने सांगितले. काही दिवसांपूर्वी आईचे निधन झाल्याने पदवीप्रदान सोहळ्याला केवळ वडील हजर राहू शकले. आईची उणीव कधीच भरून निघणार नाही.
- तृप्ती मगरे
लहानपणापासूनच तिला अभ्यासाची गोडी होती. लहानपणापासूनच कसलेही मार्गदर्शन नसताना तिने स्वप्नांचा शोध घेऊन ते पूर्ण केले. शैक्षणिक साहित्याशिवाय कुठलाच हट्ट केला नाही. आज एका रिक्षाचालकाची मुलगी एमबीबीएस झाल्याने मला बाप म्हणून तृप्तीचा खूप अभिमान वाटतो.
- मिलिंद मगरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.