छत्रपती संभाजीनगर - केंद्र सरकारने दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस आणि पॅनिक बटण (आपत्कालीन परिस्थितीसाठी) बसविणे सक्तीचे केले. मात्र, ही कुचकामी ठरलेली यंत्रणा केवळ कागदावरच दाखविली जाते. असे असताना आता बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर शिक्षणमंत्र्यांनी शाळेतही पॅनिक बटण बसविण्याची घोषणा केली आहे. मुळात पॅनिक बटण दाबल्यानंतरही कुठलीही यंत्रणा कार्यान्वित होत नाही.