जालना : जिल्ह्यात मागील दोन ते तीन आठवड्यापासून कोरोना प्रतिबंधात्मक लस पुरवठा विस्कळीत झाला आहे. लस टोचून घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागत आहेत. परंतु, लस उपलब्ध नसल्याचे अनेकांवर घरी परतण्याची वेळ येते आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर आता दुसरा डोस वेळेत मिळेल की नाही?, अशी भिती अनेकांच्या मनात आहे. मात्र, दुसरा डोस घेण्यास काही दिवसांचा विलंब झाला तरी लसीचा पहिला डोस परिणामकारक राहिल असे लसीकरण अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.जिल्ह्यात जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून २८६ शासकीय कोरोना लसीकरण केंद्र निर्माण केले आहेत. त्यामुळे प्रत्येक दिवसाला किमान २८ हजारांपेक्षा अधिक लसीकरण होऊ शकते.
मात्र, त्यासाठी शासनस्तरावरून लस पुरवठा होणे गरजेचा आहे. परंतु, मागील दोन ते तीन आठवड्यांपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या पुरवठ्याचा पूर्णतः फज्जा उडाला आहे. आजघडीला जिल्ह्यात शून्य लसीचा साठा आहे. त्यामुळे लसीकरण मोहीमही ढकलगाडी प्रमाणे सुरू असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. अशात परिस्थितीमध्ये जिल्ह्यात गुरूवारी (ता.२९) अखेरपर्यंत सुमारे एक लाख ९९ हजार ८६३ नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचण्यात आली आहे. यामध्ये एक लाख ६८ हजार २१४ जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. मात्र, केवळ ३२ हजार ६४९ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यामुळे लसीकरणाच्या दुसऱ्या डोस संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे.त्या लसीकरणाचा पुरवठा मागणीप्रमाणे होत नाही. त्यामुळे पहिला डोस घेतलेल्या अनेकांना दुसरा डोस वेळेत मिळेल की नाही ? अशी भिती निर्माण झाली आहे. परिणामी अनेक जण दुसरा डोस मिळण्यासाठी धावपळ करताना ही दिसून येत आहेत. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दुसऱ्या डोसला काही दिवसांचा अधीक कालावधी लागला तरी पहिला डोस परिणामकारक राहिल असा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र, शासनाने लसीचा पुरवठा सुरळित करून पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनाही दुसरा डोस देण्याची तजबीज करणे अपेक्षित आहे.
असा आहे लसीकरणाचा कालवधी : कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना किमान २९ ते ४० दिवसांमध्ये दुसार डोस घेणे गरजेचे आहे. तर कोव्हिशल्ड लस घेतलेल्या नागरिकांना सहा ते आठ आठवड्यांदरम्यान दुसरा डोस देणे अपेक्षित आहे.
जिल्ह्यात मागणीप्रमाणे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा होत नाही. परंतु, लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी ठरवून दिलेल्या दिवसांपेक्षा काही दिवसांचा अधीक कालावधी लागला तरी पहिला डोस परिणामकारक राहतो. त्यामुळे घाबरण्याचे गरज नाही. परंतु, पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेणे गरजेचा आहे.
-डॉ. संतोष कडले, जिल्हा लसीकरण अधिकारी, जालना.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.