Theft During Dussehra Yatra : सहावर्षीय मुलीच्या मदतीने मंगळसूत्रचोरी ; पोलिसांमुळे कर्णपुरा येथील प्रकार उघडकीस...

Dussehra Yatra the little girl was stealing : यात्रेत आपण फिरत असताना अचानक गळ्यातील मंगळसूत्र कोणी काढल्यास साहजिकच मोठ्या व्यक्तीवर संशय निर्माण होतो. मात्र, कर्णपुरा यात्रेत चक्क सहा वर्षांची मुलगी ब्लेडच्या मदतीने मंगळसूत्र कापताना आढळली.
woman
womanesakal
Updated on

karnapura : यात्रेत आपण फिरत असताना अचानक गळ्यातील मंगळसूत्र कोणी काढल्यास साहजिकच मोठ्या व्यक्तीवर संशय निर्माण होतो. मात्र, कर्णपुरा यात्रेत चक्क सहा वर्षांची मुलगी ब्लेडच्या मदतीने मंगळसूत्र कापताना आढळली. शनिवारी रात्री गर्दीत हा प्रकार घडला. वेदांतनगर पोलिसांनी या मुलीमार्फत हे कृत्य करणाऱ्या आईला ताब्यात घेत छावणी पोलिसांच्या स्वाधीन केले.

याप्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दसऱ्यानिमित्त कर्णपुरा येथे बालाजी रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी हजारो भाविकांची गर्दी उसळली होती. या गर्दीत एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्यासाठी कापले असल्याचे त्या महिलेच्या लक्षात आले.

woman
Nagpur Hit and Run Case : रितू मालूची न्यायालयीन कोठडीत रवानगी,मर्सिडिज कार अपघात प्रकरण : सीआयडीकडून मध्यरात्री अटक

तिने आजूबाजूला पाहिले असता तिच्या बाजूला केवळ सहा वर्षांची मुलगी उभी होती. संशयावरून तिला तेथे असलेल्या वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या ताब्यात देण्यात आले. निरीक्षक यादव यांनी तिची झडती घेतली असता तिच्याजवळ मंगळसूत्र आणि ते कापण्यासाठी ब्लेड ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेले यंत्र देखील दिसून आले. निरीक्षक यादव यांनी हा प्रकार ओळखून घेतला.

तिची आई जवळपास आहे याचा अंदाज त्यांना आला. काही वेळातच मुलीच्या इशाऱ्यावरून एका महिलेला ताब्यात घेण्यात आले. ही त्या मुलीची आई निघाली. जिता चिरंजीव भोसले (वय ३५, रा. हसनाबाद, जालना) असे या महिलेचे नाव आहे. जिताला छावणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली.

woman
HIt and Run Case : रितूच्या प्रकरणांवर एकाच न्यायपीठात सुनावणी घ्या,फिर्यादींची मुख्य जिल्हा व सत्र न्यायालयाला विनंती
woman
Koregaon Park Hit And Run: कोरेगाव पार्कमध्ये हीट अँड रन! आलिशान कारने दुचाकीस्वाराला उडवले, एकाचा मृत्यू

मुलीच्या खिशात मोबाइल क्रमांकाची चिठ्ठी

पोलिसांनी या मुलीची झडती घेतली असता तिच्या खिशात ब्लेड, ते लपवण्याचे लहान लाकडाचे यंत्र आणि मोबाइल क्रमांक असलेली चिठ्ठी आढळली. हा क्रमांक तिच्या आईच्या मोबाइलचा होता. समजा आई आणि मुलीची हुकाचूक झाली तर मुलीला अडचण येऊ नये म्हणून ही मोबाइल नंबरची चिठ्ठी तिच्या खिशात ठेवण्यात येत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.