Aurangabad | बिडकीनमधील महिलेचा मारेकरी ६० तासांत जेरबंद

पोलिसांनी आरोपीला पकडले
Aurangabad Crime News
Aurangabad Crime Newsesakal
Updated on

बिडकीन (जि.औरंगाबाद) : बिडकीन (ता.पैठण) येथील भारतनगर येथे राहणाऱ्या हालिमबी वजीर शेख (वय ७५) या गुरुवारी (ता.दोन) सकाळी मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्या ज्या अवस्थेत होत्या त्यावरून पोलिसांना हा खून झाला असा संशय होता. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून ७२ तासांच्या आत वयोवृद्ध महिलेच्या मारेकरी राजू इसाक शेख (वय ४५, रा. सावखेडा, ता.गंगापूर) यास शनिवारी (ता.चार) अटक केली. शनिवारी उशिरा रात्री याविषयी गुन्हा दाखल करण्यात आला. (Killer Of Bidkin Woman Arrested Within 60 Hours In Aurangabad)

Aurangabad Crime News
Parbhani | माजी नगरसेवक पोलिसांच्या जाळ्यात, जिंतूर पोलिसांची कारवाई

बिडकीन (Bidkin) पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतनगर बिडकीन येथे हालीमबी वजीर शेख या एकट्या राहत असत. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या घरातून धूर येत असल्याने त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रहिवाशांनी पोलीस ठाणे येथे संबंधित माहिती कळवली. बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने व सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवला व शवविच्छेदन केल्यानंतर घातपाताचा संशय बळावला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रकरण गंभीर असल्याने गेले दोन दिवस उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते.

Aurangabad Crime News
पोलिसांची क्रूरता! तरुणाला इलेक्ट्रिक शाॅक्स दिले, प्रकृती चिंताजनक

तपास करत असताना त्याने नातेवाईक यांची चौकशी केली. पण गुन्हा उलगडत नव्हता. दरम्यान बिडकीन येथील एका सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये एक व्यक्ती गुरुवारी पहाटेच्या सुमारास आढळून आला. त्याने वापरलेली दुचाकीवरून या गुन्ह्याचा उलगडा झाला. आरोपी मारेकरी हा मृत हालीमबी यांचा नातेवाईक सुद्धा आहे व हालीमबी यांच्या वडिलांकडून मिळालेली जमीन राजू हाच करत होता. त्याला हाजीमबीकडून दोन ते अडीच लाख रुपये उसने पैसे हवे होते. तिला बऱ्याच वेळा पैसे नाही. दिल्यामुळे त्याने हत्या केल्याची कबुली त्याने दिली. गुरुवारी पहाटे साडेतीनच्या दरम्यान दुचाकीने (एमएच 20 इक्यू 2667) राजू इसाक शेख हा तिच्या घरी गेला. तो नेहमीच येत असल्याने त्यांनी दरवाजा उघडून त्याला घरात घेतले व विचारले एवढ्या सकाळी का आलास तर तेंव्हा त्याने मला दोन अडीच लाखांची रुपये द्या, अशी मागणी केली. मात्र हालीमबी यांनी नकार दिल्याने त्याने तुमच्या अंगावरील सोने द्या. मी नंतर बनवून देईल असे म्हणले. पण परत हलीमबी नाही म्हटल्यावर त्याला राग येऊन त्याने घरात असलेला मुसळीने तीन-चार वार तिच्या डोक्यात जोरदार मारला व तिला बेशुद्ध केले. तिच्या अंगावरील सोने काढून घेतले व तेथे काहीतरी जळाल्याचा बनावं केला. (Aurangabad Crime)

Aurangabad Crime News
काश्मीरमध्ये जे घडतयं त्याने भारतीयांच्या मनात राग अन् चिंता : केजरीवाल

तसेच खुर्चीचा पाय मोडून ठेवला व तेथील घटना ही अपघात घडला असा भासवून तो तेथून पळून गेला. या विषयी आरोपी विरुद्ध मृताचा मुलगा शेख समीर शेख वजीर याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने तपास करित आहेत. सदरील कार्यवाही पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया, अपर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर रेगे, स्थानिक गुन्हा शाखा सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव प्रदीप ठुबे, जगदीश मोरे, प्रमोद खांडेभराड दीपेश नागझरे, नरेंद्र खंदारे सतीश बोडले आदींनी केले.

Aurangabad Crime News
...नऊवारी साडी नेसून इव्हेंट करण्याची गरज नाही, नीलम गोऱ्हेंची भाजपवर टीका

गावाकडे झाला होता कर्जबाजारी

हलीमाबी यांची शेती ही डीएमआयसी प्रकल्पात गेल्याने त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात मोठ्या प्रमाणात पैसे आले होते. त्यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणावर सोने दिसत असल्याने ते सोने घेऊन आपण कर्ज मुक्त होऊ, अशी त्याची अपेक्षा होती. त्यामुळे त्याची नियत फिरली होती. पैशाच्या हव्याशा पोटी त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांसमोर सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.