वाहन माझ्या समर्थकांनी नव्हे, भाजप कार्यकर्त्यांनी फोडले - किशनचंद तनवाणी

kishanchand tanwani says about broken Karad Car by BJP supporters
kishanchand tanwani says about broken Karad Car by BJP supporters
Updated on

औरंगाबाद : डॉ. भागवत कराड यांचे वाहन माझ्या समर्थकांनी फोडल्याचा बिनबुडाचा आरोप त्यांनी केला आहे, खरं तर ते वाहन भाजप कार्यकर्त्यांनी फोडले. आज यांची हकालपट्टी केल्याचे म्हणताय,मात्र हे कार्यकर्ते नव्या कार्यकारणी होते का की जुन्या ? याचा खुलासा भाजपच्या शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी करावा असे आव्हान किशनचंद तनवाणी यांनी केला. 

भाजपचे युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सचिन झवेरी, उत्तम अंभोरे यांच्या रंगनाथ राठोड, संतोष सुरे यांनी पक्ष्याच्या विरोधात गैरवर्तन केल्यामुळे त्याची हकालपट्टी केल्याचे आज पत्र भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी काढले. तनवाणी म्हणाले,डॉ. भागवत कराड आणि मी पाच वर्ष सहकारी होतो,आम्ही बरोबर काम केले .आता मी भाजप सोडून शिवसेनेत आल्यानंतर कराड काहीही आरोप करत आहे. आणि हा आरोप कदाचित माझ्या समर्थकांना पटलेला नसावा. असेही तनवाणी म्हणाले. 

सत्तेचा कुठलाच उपभोग घेतलेला नाही

पाच वर्षे सत्तेत सहभाग असताना मी सत्तेचा कुठलाच उपभोग घेतलेला नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप कडे सक्षम उमेदवार नव्हता. म्हणून मला उमेदवारी दिली होती. मध्य मतदारसंघात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.भागवत कराड व शहराध्यक्ष संजय केणेकर असतानाही मला उमेदवारी देण्यात आली होती, याचा अर्थ ते सक्षम नव्हते असेच म्हणावे लागेल. 

आपक्षाचा एक गट  भाजप पक्षाच्या पाठीमागे

या निवडणुकीनंतर मी सक्रियपणे भाजपचे काम केले, केवळ १४ ते १५ नगरसेवक असलेल्या भाजपच्या नगरसेवकांची संख्या २५ वर घेऊन गेलो. त्यात मध्य मध्ये फक्त चार नगरसेवक होते, आता भाजपचे नगरसेवक आहेत. यास आपक्षाचा एक गट तयार करून तो,भाजप पक्षाच्या पाठीमागे उभा केला. माझा भाऊ अपक्ष म्हणून गुलमंडीवर निवडून आला, आणि मुलगा अपक्षांच्या जोरावर नगरसेवक झाला आहे. त्यात भाजपचा कुठलाच सहभाग नाही. आणि मी कुठलीही सत्ता भोगलेली नाही. यामुळे असे बिनबुडाचे आरोप डॉ. कराड यांनी करू नयेत.२०१५ च्या महापालिका निवडणुकीत डॉ. कराड यांच्या घरचे निवडणुकीत उभे होते ,युती असतानाही ते निवडून येऊ शकले नाही असेही तनवाणी म्हणाले. 

हकालपट्टी केलेले नेमके कोणत्या कार्यकारिणीतील 

केणेकराच्या मते जर नवीन कार्यकारणी स्थापन झाली असेल, तर जुन्या कार्यकारिणीतील सदस्यांची हकालपट्टी कशी होऊ शकते. हकालपट्टी केलेले नेमके कोणत्या कार्यकारिणीतील आहे, याचा खुलासा केणेकर यांनी करावा. ते जर भाजपच्या कार्यकारिणीतील सदस्य असेल तर ते भाजपचे कार्यकर्ते आहेत असेच म्हणावे लागेल. असेही किशनचंद तनवाणी यांनी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.