पैठण : सरकारने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जागतिक बँकेच्या साहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा) योजना सुरु करण्यात आली आहे. पैठण तालुक्यात या योजनेंतर्गत १० हजार ६६७ शेतकरी लाभार्थ्यांना ४७ कोटी ३२ लाख ३७ हजार ७२४ रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे. यामुळे तालुक्यातील बळिराजाला संजीवनी मिळाल्याचे चित्र आहे.
हवामानात होणाऱ्या सततच्या बदलामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाच्या सामोरे जावे लागत आहे. तसेच भूभागातील जलसाठ्यावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याच्या वाढत्या घटनांमुळे परिणामी पिकांच्या उत्पादकांमध्ये कमालीची घट आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजना सुरु केली आहे. ६०० कोटींचे उद्दिष्ट शासनाने राज्यभर आखले असून या योजनेसाठी पैठण तालुक्यातील ५७ गावांची निवड करण्यात आली आहे.
या गावांमध्ये ग्राम संजीवनी समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत ६८ हजार ७८२ अर्ज कृषीविभागात प्राप्त झाले आहेत. या योजनेसाठी निवडण्यात आलेल्या ५७ गावांतील लाभार्थी निकषास पात्र ठरले आहे. अजून अनेक अर्ज प्रलंबित आहेत. लाभार्थ्यांना यांत्रिकीकरण, शेततळे, ठिबक, शेतीशाळा, कंपोस्ट खत, पाइप, फळबाग, प्रमाणित बियाणे, रुंद सरी वरंबा, विहीर पुनर्भरण, तुती लागवड, शेटनेट, शेळी पालन, तुषार सिंचन, विद्युत सिंचन या अनुषंगाने विविध प्रकारच्या गटात अर्ज दाखल करून लाभ घेतला आहे.
पोकरा योजनेसाठी निवडलेल्या गावांतील शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन योजनेचा सर्वाधिक लाभ घेतला आहे. या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी. गावातील ग्राम कृषी संजीवनी समिती, कृषी सहायकांकडे तत्काळ नोंदणी करून योजनांचा लाभ घ्यावा. तसेच हवामान आधारित पीक पद्धतीने शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सिंचनाखाली शेत क्षेत्रात वाढ होण्याकरिता पोकरा योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन प्रगती करावी.
-संदीप शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी, पैठण.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.