Laxman Hake : काळे फासणे म्हणजे झुंडशाही ; लक्ष्मण हाके

लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवेदन देऊन मागणी करण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यांना कोणी विरोध करू नये, म्हणून एखाद्या निवेदनकर्त्याला काळे फासणे म्हणजे झुंडशाही असून, कायद्याचा आवाज दाबण्याचे काम राज्यात होत आहे, असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मंगळवारी (ता. २५) म्हटले.
Laxman Hake
Laxman Hakesakal
Updated on

जालना : लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवेदन देऊन मागणी करण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यांना कोणी विरोध करू नये, म्हणून एखाद्या निवेदनकर्त्याला काळे फासणे म्हणजे झुंडशाही असून, कायद्याचा आवाज दाबण्याचे काम राज्यात होत आहे, असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मंगळवारी (ता. २५) म्हटले.

छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जरांगे यांचे जुने सहकारी आणि त्यांना गावात उपोषण करण्यास विरोध करणारे डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासल्याचा प्रकार सोमवारी (ता. २४) घडला होता. यासंदर्भात बोलताना हाके म्हणाले, की एखाद्या गावामध्ये एकच गोष्ट सातत्याने घडत असल्याने विद्यार्थी, महिला, वृद्धांवर याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होतो. डॉ. तारख यांच्यासोबत ग्रामपंचायतीचे काही सदस्यही होते. त्यांनी निवेदन दिल्यानंतर आंदोलनाला परवानगी द्यायची की नाही, हे प्रशासन ठरवते. मात्र, विरोध केला म्हणून एखाद्या व्यक्तीच्या तोंडाला काळे फासणे, हे बेकायदेशीर आहे. आपले हक्क मागण्यासाठी आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीने दिला आहे. मात्र, आंदोलन करत असताना कोणाला त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असा सल्लाही हाके यांनी मनोज जरांगे यांना त्यांचे नाव न घेता दिला.

मनोज जरांगे यांची मागणी नेमकी काय, हे अद्याप लक्षात येत नाही. प्रत्येक वेळी त्यांची मागणी वेगळी असते. आरक्षणाच्या नावाखाली त्यांनी राजकारण सुरू केले आहे. ते लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे. ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी आरक्षणावर गदा आणणार असेल, तर त्याला लोकशाही पद्धतीने उत्तर देऊ, असेही हाके यांनी स्पष्ट केले.

माहितीच्या अधिकारात माहिती मागवा

सगेसोयरे नोटिफिकेशनवर लाखोंनी हरकती नोंदविल्या आहेत. त्याची श्वेतपत्रिका काढण्याचे मागणी राज्य शासनाकडे केली आहे. मात्र, शासन यावर काहीच करत नाही. त्यामुळे राज्यातील प्रत्येक ओबीसी समाजबांधवांनी तहसील कार्यालयाकडे कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा नोंदी किती झाल्या याची माहिती माहितीच्या अधिकारात मागवावी, असे आवाहन हाके यांनी केले आहे.

Laxman Hake
Laxman Hake News: लक्ष्मण हाके शरद पवारांबद्दल काय बोलले?

लक्ष्मण हाके अभिवादन दौऱ्यावर

शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले लक्ष्मण हाके हे बुधवारपासून (ता.२६) तीन दिवसांच्या अभिवादन दौऱ्यावर जाणार आहेत. बुधवारी मॉं साहेब जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेडराजा येथून या दौऱ्याला सुरवात होणार आहे. त्यानंतर बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे ते जाणार आहेत. गुरूवारी (ता.२७) गोपीनाथगड, भगवानगड आणि शुक्रवारी (ता.२८) चौंडी येथे ते जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.