Chhatrapati Sambhajinagr : ब्राह्मण तरुणांनी उद्योजक व्हावे अधिवेशनात राज्यभरातून आलेल्या तज्ज्ञांचा सूर

नोकरी मिळत नाही, म्हणून मागे पडतात. आपण नोकरी करणारे नव्हे, तर नोकरी निर्माण करणारे होऊया. तरुणांनो नोकरीच्या मागे न लागता नवनवीन उद्योग निर्माण करा
legislative assembly session brahmin community youth should be in enterpreuner
legislative assembly session brahmin community youth should be in enterpreuneresakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : ज्या समाजाने कधीकाळी राष्ट्राला मार्गदर्शन केले, त्या समाजातील अनेक तरुण आज नोकरीच्या मागे धावतात. नोकरी मिळत नाही, म्हणून मागे पडतात. आपण नोकरी करणारे नव्हे, तर नोकरी निर्माण करणारे होऊया. तरुणांनो नोकरीच्या मागे न लागता नवनवीन उद्योग निर्माण करा, असा सूर रविवारी (ता. ३०) आयोजित ब्राह्मण अधिवेशनातून निघाला.

अखिल भारतीय पेशवा संघटनेच्या वतीने रविवारी तापडिया नाट्यमंदिर येथे एकदिवसाच्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. समर्थनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणूक काढण्यात आली.

संगीत क्षेत्रात अतुलनीय योगदानाबद्दल पंडित विजय गोविंदराव देशमुख यांना जीवनगौरव पुरस्काराने, बहुभाषिक ब्राह्मण अधिवेशन परभणी २००७ चे अध्यक्ष बंडूनाना सराफ यांना सन्मानित करण्यात आले. विश्लेषक सुशील कुलकर्णी यांचीही यावेळी उपस्थिती होती. प्रथमेश महाजन याने जयोस्तुते गीत गायले.

आचार्य महामंडलेश्वर महंत सुधीर दास महाराज यांनी ‘ब्राह्मण आणि संस्कार’ विषयावर विचार मांडून पसायदानाने अधिवेशनाचा समारोप केला. पंकज कुलकर्णी, संजय क्षीरसागर, मोरेश्वर मार्डीकर, संजय देशपांडे, चेतन जोशी, विनायक देशपांडे, महेश कुलकर्णी, संतोष कुलकर्णी, सुप्रिया वाडे, वर्षा कुलकर्णी, गीता आचार्य, सुनीता नारळे, मनीषा क्षीरसागर आदींनी अधिवेशन यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

मान्यवरांकडून विविध विषयांवर मार्गदर्शन

ब्राह्मण ऐक्य परिषदेचे अध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी ‘ब्राह्मण संघटन आणि दिशादर्शन’ विषयावर, निखिल लातूरकर व जालना ब्राह्मण सभा उपाध्यक्ष रमेश हेडकर यांनी ‘ब्राह्मण सभा भवन उभारणी’ विषयावर, मंत्रालयातील प्रशासकीय अधिकारी मंजूषा कुलकर्णी यांनी ‘ब्राह्मण युवती-ज्ञानज्योती संस्कार’ या विषयावर भाषणे केली.

देवगिरी सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण नांदेडकर यांनी ‘ब्राह्मण समाजासाठी शासकीय कर्ज योजना’ विषयावर माहिती दिली. ॲड. भानुदास शौचे यांनी ‘ब्राह्मण समाज आणि संघटन’ विषयावर विचार मांडले. सरकारी वकील गोविंद कुलकर्णी यांनी ‘न्यायालयीन व्यवस्थेमध्ये ब्राह्मण समाजाचे योगदान’ विषयावर मंथन केले.

अधिवेशनातील महत्त्वाचे ठराव

ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र परशुराम आर्थिक विकास महामंडळ, इनामी जमिनीवर खासगी मालकीच्या करून देणे, स्वांतत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार, श्रीमंत बालाजी विश्वनाथ पेशवे यांचे श्रीवर्धन येथे भव्य स्मारक, जिल्हास्तरीय ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणे, ब्राह्मण समाजातील विधवा महिलांसाठी मासिक तीन हजार रुपये पेन्शन लागू करणे आदी ठराव यावेळी मांडण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.