बिबट्याच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी, वैजापूर तालुक्यातील घटना

leopard
leopard
Updated on
Summary

घटना घडल्यापासून ग्रामस्थांनी वैजापूर येथील वनविभागाला मदतीसाठी संपर्क साधला. पण अद्यापही वनविभागाचे संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले नाहीत.

वैजापूर (जि.औरंगाबाद) : वैजापूर Vaijapur तालुक्यातील वाकला येथे ऐतिहासिक घुमट परिसरात आज रविवारी (ता.२०) सकाळी बिबट्याचे दर्शन झाले आहे. बिबट्या Leopard पाहण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी मोठ्या गर्दी केली होती. यावेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात Leopard Attack दोघे गंभीर जखमी झाले आहेत. चंद्रकांत जाधव व बाळू शेजवळ ( दोघेही रा.वाकला, ता. वैजापूर) असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी तालुक्यातील लोणी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात Primary Health Centre दाखल करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे Shiv Sena उपतालुकाप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी दिली. Leopard Attack On Two Men In Vaijapur Tahsil, Injured Admitted In Primary Health Centre

leopard
Yoga Day : योग दिनाच्या जनजागृतीसाठी औरंगाबादेत सायकल फेरी

सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. घटना घडल्यापासून ग्रामस्थांनी वैजापूर येथील वनविभागाला मदतीसाठी संपर्क साधला. पण अद्यापही वनविभागाचे संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले नाहीत. यातून वनविभागाचा निष्काळजीपणाच दिसत आहे.सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घटना घडल्यानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास म्हणजे तब्बल तीन तासांनंतर शिऊर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र वन विभागाचा कुणीही अधिकारी व कर्मचारी दुपारपर्यंत घटनास्थळी दाखल झाले नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.