Corona Vaccination: औरंगाबाद शहरात केवळ १४.५५ टक्के लसीकरण!

शहराची १६ लाख लोकसंख्या गृहित धरली जात असून, महापालिकेला ७० टक्के म्हणजेच ११ लाख ७६ हजार ९९९ एवढ्या लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे
corona vaccination
corona vaccinationcorona vaccination
Updated on

औरंगाबाद: कोरोना प्रतिबंधक लसींच्या तुटवड्यामुळे डोस टोचण्याची गती मंदावली आहे. गेल्या सात महिन्यात एक लाख ७४ हजार नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे. त्याची टक्केवारी केवळ १४.५५ एवढी आहे. शहराची १६ लाख लोकसंख्या गृहित धरली जात असून, महापालिकेला ७० टक्के म्हणजेच ११ लाख ७६ हजार ९९९ एवढ्या लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत शहराला दिलासा मिळू शकतो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, दुसऱ्या डोससाठी वेटींगवर असलेल्या नागरिकांची संख्या पुन्हा एक लाखावर गेली आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात कोरोना काळात काम करणारे आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्स, ४५ वर्षापुढील आजारी व्यक्ती व त्यानंतर १८ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. महापालिकेला शहरातील ७० टक्के म्हणजेच ११लाख ७६ हजार ९९९ एवढ्या लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार तीन ते चार महिन्यात हे उद्दिष्ट पूर्ण करण्याची तयारी प्रशासनाने केली होती. शहरातील ११५ वॉर्डात प्रत्येकी एक, तसेच सरकारी कार्यालयातही लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. पण १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्यापासून कोविशिल्ड व कोवॅक्सिन लसीचा तुटवडा कायम आहे.

corona vaccination
औरंगाबाद : सरणावरच आजीबाई झाल्या जिवंत

महापालिकेतर्फे प्रत्येक आठवड्यासाठी एक लाख लसींची मागणी आहे पण प्रत्यक्षात कधी पाच हजार कधी दहा हजार एवढ्या लसी मिळत आहेत. त्यामुळे लसीकरणाची गती मंदावली आहे. गेल्या सात महिन्यात म्हणजेच एक ऑगस्टपर्यंत पाच लाख ८६ हजार ९३२ लसीकरण पूर्ण झाले आहे. यातील केवळ एक लाख ७४ हजार नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. त्याची टक्केवारी केवळ १४.५५ एवढी आहे. ७० टक्के नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट असताना सात महिन्यात केवळ १४ टक्के लसीकरण झाले आहे.

सव्वाशे दिवसानंतरही मिळेना लस
केंद्र शासनाने कोविशिल्डच्या दोन लसीमधील डोसचे अंतर ८४ दिवसांचे ठेवले आहे. पण शहरातील अनेक नागरिकांना १२५ दिवस पूर्ण झालेले आहेत. मात्र दुसरा डोस मिळत नसल्याचे चित्र आहे.

corona vaccination
नायगाव शिवारात दिसला वनगवा, शेतकऱ्यांमध्ये दहशत

लसीकरणाची स्थिती-
उद्दिष्ट- ११७६९९९
आत्तापर्यंतचे लसीकरण- ५८६९३२
दोन्ही डोस घेतलेले नागरिक- १,७१,२८१
पहिला डोस घेतलेले नागरिक-४,१५,६५१
दुसऱ्या डोससाठी वेटींगवर नागरिक- १,०००००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.