लॉकडाउनने दिली व्यवसायाची दिशा; भावंडांनी विकसित केला ‘ग्रॅनोला’चा ब्रॅण्ड

लॉकडाउनच्या काळात ‘रॅड रुटीन ग्रॅनोला अॅण्ड मोर’ नावाने स्टार्टअप केला सुरू
business
business
Updated on

औरंगाबाद : कोरोनाकाळात लागू झालेल्या लॉकडाउनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या, व्यवसाय, उद्योग अडचणीत आले. दुसरीकडे याच लॉकडाउनमध्ये नव्याने भरारी घेण्याची प्रेरणाही कित्येकांनी मिळाली. त्यात जालना येथील तेजस अग्रवाल आणि लविना अग्रवाल या बहीण - भावाचा समावेश आहे. लॉकडाउनच्या काळात त्यांनी ‘रॅड रुटीन ग्रॅनोला अॅण्ड मोर’ नावाने स्टार्टअप सुरू केला.

या भावंडांनी ‘ग्रॅनोला’ हा स्वतःचा ब्रॅण्ड विकसित केला. त्यासोबत विविध प्रकारचे केक तयार केले. त्यांनी तयार केलेला ग्रॅनोला ॲमेझॉनवर ऑनलाइन तर मुंबई, बंगळूर येथील रिटेल स्टोअरमध्ये विक्रीस उपलब्ध केला. पौष्टिक पदार्थ असलेला ग्रॅनोला हे नाश्ता आणि स्नॅक फूड म्हणून ओळखला जाते. गेल्या काही वर्षांपासून हा पदार्थ भारतातही मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातोय.

लविना अग्रवाल यांचे शिक्षण जालना येथे झाले. त्यानंतर त्या सीए झाल्या. सीए म्‍हणून दोन वर्षे मुंबईत नोकरी केली. त्यांचे लहान बंधू तेजस अग्रवाल यांचे बारावीपर्यंत शिक्षण जालन्यात तर मुंबईत मॅनेजमेंट स्टडीजचे शिक्षण पूर्ण केले. पहिले लॉकडाउनवेळी लविना यांना मुंबईहून जालना येथे परतावे लागले.

या काळात अनेकांनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करण्याचे प्रयोग केले. तसे लविना यांनीही. मात्र त्यांनी तयार केलेला ग्रॅनोला कुटुंबीयांसह, मित्रपरिवार, शेजाऱ्यांना आवडला. ग्रॅनोलाची विशिष्ट चव असल्याने या दोघांनी त्याला व्यावसायिक स्वरूपात देण्याचे ठरविले. यासाठी मार्केटचा अभ्यास केला. यानंतर तेजस यांच्या नावाने ‘रॅड रुटीन ग्रॅनोला अॅण्ड मोर’ नावाने कंपनी स्थापन केली. याच नावाने ग्रॅनोलाचा ब्रॅण्ड विकसित केला.

ग्राहकांचा चांगला प्रतिसाद

लविना यांनी जालना येथील त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या जागेत ग्रॅनोला तयार करायला सुरवात केली. त्यांच्याकडे ड्रायफ्रुट कटिंग, पॅकेजिंग तसेच इतर कामांसाठी पाच महिला कार्यरत आहे. सध्या ते पाच फ्लेवरमध्ये ग्रॅनोला तयार करत आहे. आकर्षक पॅकिंग करून मार्केटिंग करीत आहेत. सोबत विविध प्रकारचे केकही तयार केले जात आहेत. ग्रॅनोलाचे उत्पादन ॲमेझॉन, स्वतःच्या वेबसाइटवर ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध केले आले. देशभर ग्राहकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. गत दिवाळीत अनेक कंपन्यांनी आपल्या कामगारांना भेटस्वरूपात देण्यासाठी ग्रॅनोलाची नोदणी केली. ऑनलाइन विक्रीस प्रतिसाद मिळाल्यानंतर आता त्यांनी मुंबई, महाराष्ट्रासह, बंगळूर, येथील रिटेल स्टोरअरमध्येही उत्पादने ठेवली आहेत.

आता कॉफी ब्रॅण्डवर काम

लविना यांनी ऑस्ट्रेलियातील मैत्रिणीला ग्रॅनोला पाठविला होता. त्यानतंर तेथूनही मागणी सुरू झाली. मार्केटिंगची जबाबदारी तेजस यांच्याकडे आहे. आता ते स्वतःच्या कॉफी ब्रॅण्डवर काम करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.