औरंगाबाद : वेळ आली होती. पण काळ आला नव्हता, अशी एक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. एक महिला रेल्वे रुळ ओलांडत असताना रेल्वे रुळच्या मधोमध असलेल्या लोखंडी क्लिपमध्ये पाय अडकून पडली. रुळावरून तिला काही हालताही येत नव्हते. त्याच वेळी रेल्वे (Railway) आली, पण ती बचावली. हा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. रेल्वेच्या लोकोपायलटमुळे तिचा जीव वाचला.औरंगाबादच्या (Aurangabad) मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना आज सोमवारी (ता.३०) घडली आहे. (Loco Pilot Save Woman Life After Stop Janshatabdi Express In Aurangabad)
जालनाहुन मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस (Janshatabdi Express) निघाली होती. त्याच वेळी ही महिला रेल्वे रुळ ओलांडत होती आणि त्याच दरम्यान रुळामध्ये पाय अडकून पडली. हे लोकोपायलटच्या लक्षात आल्याने त्यांनी जोरात हॉर्न वाजवले. त्याचवेळी ती महिला उठू शकत नसल्याचे लक्षात आल्यानंतर रेल्वेचा इमर्जन्सी ब्रेक लावून रेल्वे स्लो करण्याचा प्रयत्न लोकोपायलटने केला. त्यावेळी ती महिला पटरीच्या मधोमध पडून राहिली. ब्रेक धरल्यानंतर चार डब्बे वरून पुढं गेले आणि रेल्वे थांबली. सुदैवाने ती वाचली. विशेष म्हणजे कोणतीच जखम झाली नाही. घाबरलेल्या महिलेला धीर देत तिला घरी पाठवण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.