Chhatrapati Sambhaji Nagar : लोकसभेसाठी महायुतीची आज गुफ्तगू! भाजपच्या पुढाकाराने पहिले पाऊल, जिल्हाध्यक्षांची आज बैठक

सोमवारी दुपारी तीन वाजता आयएमए हॉलमध्ये महायुतीतील तीनही पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडणार आहे.
lok sabha elections mahayuti  meet up bjp shivsena ncp today
lok sabha elections mahayuti meet up bjp shivsena ncp todayesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील महायुती स्थानिक पातळीवरही घट्ट व्हावी, यासह येत्या काळात होऊ घातलेल्या लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदार संघाच्या दृष्टीने महायुतीने पहिले पाऊल टाकले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने सोमवारी (ता. आठ) घटक पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची आयएमए हॉलमध्ये बैठक होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचे सरकार सत्तेत आहे.

राज्याप्रमाणेच स्थानिक पातळीवरही महायुती एकत्रित राहावी, यासह लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाची नियोजन बैठक भाजपच्या पुढाकाराने होत आहे. सोमवारी दुपारी तीन वाजता आयएमए हॉलमध्ये महायुतीतील तीनही पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडणार आहे.

कोणाला निमंत्रण?

या बैठकीचे निरोप भाजप, शिंदे गटाच्या प्रत्येकी तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन अशा आठ जणांना रविवारी (ता. सात) सायंकाळी देण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने युतीतील पक्षांनी एकत्र काम करावे, समन्वय साधावा, बूथ वरील कार्यकर्त्यांनीही कसे एकत्रित काम करावे, यावर चर्चा होणार आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

विधानसभानिहाय मेळावे

जिल्हाध्यक्षांच्या या बैठकीनंतर पुढचे पाऊल टाकले जाणार आहे. त्यात विधानसभानिहाय तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे येत्या १० दिवसांत एकत्रित मेळावे घेतले जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.