Sambhaji Nagar : कारखान्याच्या वाटेवर अंधार ; कामगारांची लूटमार : एमआयडीसीसह पोलिसांचे दुर्लक्ष

वाळूज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टरमध्ये असलेल्या कंपन्यांच्या वाटेवर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी या परिसरात कामगारांची लुटमारीचे प्रकार सर्रास घडत आहे.
sambhaji nagar
sambhaji nagar sakal
Updated on

वाळूजमहानगर : वाळूज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टरमध्ये असलेल्या कंपन्यांच्या वाटेवर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी या परिसरात कामगारांची लुटमारीचे प्रकार सर्रास घडत आहे. मात्र, याकडे एमआयडीसी व पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने कामगारांसह नागरिकांमध्ये नाराजी आहे.

वाळूज औद्योगिक वसाहतीच्या चारही बाजूंनी अनेक लहान-मोठी गावे आहेत. या गावांमधून सर्व बाजूंनी औद्योगिक वसाहतीत कामगार येत असतात. त्यातीलच पंढरपूरकडून धर्मवीर राजे संभाजी चौक व सी सेक्टरमार्गे कारखान्यांकडे वाट जाते.

वाळूज औद्योगिक वसाहतीत जाणारी ही वाट जवळची (शॉर्टकट) असल्यामुळे या वाटेवरून बहुतांश कामगार हे पायी ये जा करतात. त्यात महिला कामगारांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. याच वाटेवरील धर्मवीर राजे संभाजी चौक ते वैष्णोदेवी गार्डन दरम्यानची स्ट्रीट लाईट (पथदिवे) गेल्या अनेक दिवसापासून बंद आहेत. त्यामुळे या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

sambhaji nagar
Sambhaji Nagar : सर्दी, खोकला साथ साथ ; एकाच रुग्णालयात दिवसाकाठी तब्बल ५० ते ६० रुग्ण

या अंधाराचा फायदा घेत अनेक टवाळखोरांसह गुंड मवाली रस्त्याच्या कडेला थांबतात. रस्त्याने मोबाईलवर बोलत जात असताना ते पाठीमागून येऊन मोबाईल हिस्कावतात आणि पळ काढतात. याशिवाय अनेकांना शास्त्राचा धाक दाखवून लुटमार होत असते. मात्र याकडे एमआयडीसीचे तसेच पोलिसांचेही दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. या कंपनीच्या वाटेवर सर्रास होणाऱ्या या लुटमारीमुळे कामगारांसह नागरिकही त्रस्त आहेत.

पोलिसांनी गस्त घालावी

गौतम बर्वे : येण्या-जाण्यासाठी हा रस्ता शॉर्टकट आहे. या रस्त्यावरून कामगारांची नेहमी वर्दळ असते. मात्र, रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने या रस्त्यावर अंधार असतो. त्यामुळे लुटमारीचे प्रकार होतात. बंद पडलेले पथदिवे एमआयडीसीने सुरू करावेत. तसेच पोलिसांनी गस्त घालावी.

नेहमीच अंधार

कैलास डोमळे : धर्मवीर राजे संभाजी चौक ते वैष्णोदेवी गार्डनदरम्यानचा हा रस्ता कंपनीत जाण्यायेण्यासाठी अत्यंत जवळचा आहे. पायी जाणारे सर्वच कामगार याच रस्त्याने ये-जा करतात. त्यात महिला कामगारही असतात. येथील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे नेहमी अंधार असतो. काही टवाळखोर कामगारांना लुटतात, मोबाईल हिसकावून पळ काढतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.