राम टेकडीवरील वादामुळे महाराज-भाविकांचे परस्परविरोधी गुन्हे दाखल, चौदा जणांना अटक

crime11
crime11
Updated on

चितेगाव (जि.औरंगाबाद) : जाभंळी तांडा (ता.पैठण) येथील रामटेकडीवरील राम मंदिरातील महाराज व अज्ञात लोकात गाईवरुन शुक्रवारी (ता. २५) भांडण झाले होते. यात महाराज जखमी झाले होते. हल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर दुस-या दिवशी शनिवार (ता.२६) राञी उशिरा परस्पर विरोधी बिडकिन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचार घेत आसलेल्या गणेश महाराज यांच्या तक्रारी वरून बिडकिन पोलीसांनी चौदा जणावर  गुन्हे दाखल केले आहेत. जांभळी (ता.पैठण) जवळ मेहरबान नाईक तांडा असून परिसरात प्राचीन रामटेकडीवर  राम मंदीर आहे. या राम टेकडीवर नेहमीच धार्मिक कार्यक्रम होत आसतात. शुक्रवार (ता. २५) मोक्षदा एकादशी निमित्ताने  परिसरातील निलजगाव येथील भाविकांनी राम टेकडी येथे पायी दिंडी नेली होती. राम मंदिरात दर्शन झाल्यानंतर दिंडीतील महिला व बालके टेकडीवर फराळ करण्यासाठी बसले असता राम टेकडीवर वास्तव्यास आसणारे गणेश गिरी महाराजांच्या मालकीची गाय या महिलामध्ये घुसली त्यामुळे महिला व बालके घाबरले त्यांना त्रास होऊ नये म्हणून एक दोन भाविकांनी गायीस तेथून हुसकावून लावले.

गायीला हुसकावले म्हणून महाराजांना राग आला व त्यांनी गाय हुसकावणाऱ्या भाविकांनी काठीने मारहान करून जखमी केले. तर गावातील भाविकांना का मारले याचा जाब विचारण्यासाठी इतर भाविक गेले असता महाराज व भाविकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. वाद जास्तच विकोपाला गेल्यावर गणेश गिरी महाराजांनी भाविकांवर दोन तलवारी काढल्या नंतर भाविकांनी दगडफेक केली.

या हल्ल्याप्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौदा जणाना अटक करण्यात आली आहे. निलजगांव येथील भरत महाराज मोगल यांच्या तक्रारी वरून गणेश महाराज गिरी यांच्या विरोधात हत्यार बाळगणे व इतर कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बिडकिन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज उदावंत व पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील करित आहे.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.