UPI Transaction : महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे यूपीआय व्यवहार बंद; जिल्ह्यातील २६ शाखांमधील ग्राहकांना फटका

स्थानिक बँकांच्या व्यवहारासाठी तंत्रज्ञान सेवा पुरवीत असलेल्या कंपनीवर सायबर हल्ला झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या २६ शाखांमधील ग्राहकांचे यूपीआय व्यवहार बंद आहे.
UPI Transaction
UPI Transaction sakal
Updated on

जाफराबाद : स्थानिक बँकांच्या व्यवहारासाठी तंत्रज्ञान सेवा पुरवीत असलेल्या कंपनीवर सायबर हल्ला झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या २६ शाखांमधील ग्राहकांचे यूपीआय व्यवहार बंद आहे.

ग्रामीण बँकांसाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) अंतर्गत सी- एज टेक्नॉलॉजी ही कंपनी बँकांना तंत्रज्ञान सेवा पुरविते. परंतु तंत्रज्ञानावर आधारित यूपीआय पेमेंट सदर कंपनीवर सायबर हल्ला झाल्याने ग्रामीण बँकेचे यूपीआय पेमेंट खाते बंद करण्यात आले आहे.

दरम्यान, या कंपनीवर सायबर हल्ला झाल्याने पेमेंट नेटवर्कमध्ये अडचणी निर्माण झाले आहेत. त्या अनुषंगाने ग्रामीण बँकेमधील यूपीआय पेमेंटचा व्यवहार मागील पाच ते सहा दिवसांपासून बंद आहे. यामुळे ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

UPI Transaction
UPI Payment : नो टेन्शन! इंटरनेटशिवायही ऑनलाइन पेमेंट करू शकता, फॉलो करा 'या' स्टेप्स

यासंदर्भात बँकेच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता, यूपीआय पेमेंट करणाऱ्या कंपनीचे नेटवर्क हॅक होत असल्याने ग्राहकांच्या खात्यातील पैसे इतरत्र जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे सद्यःस्थितीत यूपीआय पेमेंट बंद करण्यात आलेले आहे.

याशिवाय सर्वसाधारण व्यवहार मात्र सुरळीतपणे सुरू आहेत. जालना जिल्ह्यामध्ये सद्यःस्थितीत ग्रामीण बँकेच्या २६ शाखा आहेत. या सर्वच शाखांमध्ये असलेले यूपीआय पेमेंट सद्यःस्थितीत बंद आहेत. सी एच कंपनीच्या तंत्रज्ञान सेवा घेणाऱ्या ग्रामीण बँकेसह इतर लहान मोठ्या जवळपास ३०० बँकांना या बाबीचा फटका बसला आहे.

UPI Transaction
E-Peek Pahani Online: मोबाइलवरून कशी कराल ई पीक पाहणी? शेतकऱ्यांनो ही बातमी वाचा नाहीतर सरकारी मदतीपासून राहाल वंचित

इतरत्र जाण्याची शक्यता

बँकांच्या पेमेंट सिस्टीममध्ये तंत्रज्ञानामुळे अडचणी निर्माण झाल्याने ग्राहकांनी सद्यःस्थितीत पेमेंटचे आदान प्रदान करू नये. यामध्ये ग्राहकांच्या खात्यातील पैसा इतरत्र जाण्याची शक्यता असल्याने सदर पेमेंट सिस्टीम बंद आहे.

यामुळे ग्राहकांनी घाबरून न जाता तंत्रज्ञान सेवा देणाऱ्या कंपनीमध्ये दुरुस्तीचे काम सुरू आहे. यामुळे लवकरच सर्व व्यवहार सुरळीत होतील, असे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने तंत्रज्ञान सेवाआभावी पेमेंट बंद असल्याने बँकांना सुचविले आहेत. दरम्यान, शुक्रवारी फोन पे व यूपीआय सुविधा काहीअंशी सुरू झाल्याचे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.