Sambhaji Nagar News : क्लासेसला निर्बंध नको, नियमावली हवी ; कोचिंग क्लासेस असोसिएशनची भूमिका

सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग बंदी हा केंद्र सरकारने कोचिंग क्लासेसच्या बाबतीत टाकलेला निर्बंध चुकीचा आहे. क्लासेसला निर्बंध नको मात्र नियमावली असावी अशी भूमिका महाराष्ट्र राज्य कोचींग क्लासेस असोसिएशनच्या ( सीसीए) वतीने शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मांडण्यात आली.
sambhaji nagar
sambhaji nagar sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग बंदी हा केंद्र सरकारने कोचिंग क्लासेसच्या बाबतीत टाकलेला निर्बंध चुकीचा आहे. क्लासेसला निर्बंध नको मात्र नियमावली असावी अशी भूमिका महाराष्ट्र राज्य कोचींग क्लासेस असोसिएशनच्या ( सीसीए) वतीने शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मांडण्यात आली.

गेल्या आठवड्यात केंद्र शासनाने कोचिंग क्लासेससाठी निर्बंध जाहीर केले. या निर्बंधाचा सीसीएच्यावतीने निषेध करण्यात आला आहे. क्लासेसचे संचालक पदवीधर असावे या गोष्टीचे सीसीएने समर्थन केले आहे.

sambhaji nagar
Sambhaji Nagar News : उभ्या कंटेनरला कारची धडक ; चालक तरुणाचा जागीच मृत्यू

सोळा वर्षाखालील विद्यार्थ्याला प्रवेश देता येणार नाही या तत्वाला सीसीएने विरोध केला आहे. जर विद्यार्थ्याचा पायाच पक्का नसेल तर पुढे विद्यार्थी घडतील कसे असा प्रश्न निर्माण करीत शासनाने आपली बौध्दीक दिवाळखोरी जाहीर केली असल्याचा आरोप सीसीएने केला आहे. या पत्रकार परिषदेला प्रमुख मार्गदर्शक प्रा. गोपीचंद चाटे, राज्याध्यक्ष पी. एम. वाघ, प्रा. संदिप मस्के, प्रा. ज्ञानेश्वर ढाकणे, प्रा. राजेश इप्पर यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.