वाळूज (जि.औरंगाबाद) : वाळूज औद्योगिक वसाहतीकडून नगरकडे भरधाव जाणारा कंटेनर व लिंबेजळगावकडून पंढरपूरकडे जाणारा आयशर टेंपो यांच्यात भीषण अपघात होऊन एक जण जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाला. हा अपघात वाळूज (Waluj) जवळील गरवारे गेट समोर सोमवारी (ता.२८) पहाटे साडेबाराच्या सुमारास झाला. बँटको रोडलाईन्सचा आयशर टेम्पो (एमएच २० ईजी ०९४५) हा वाळुजकडून पंढरपूरकडे (Pandharpur) जात होता. गरवारे कंपनी समोर दुपारी झालेल्या अपघातामुळे पडलेल्या रस्त्यावरील दगडावर हा टेम्पो गेल्याने चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला. त्यामुळे हा भरधाव टेंपोविरुद्ध दिशेला गेला. (Man Died, One Serious Injured In Accident In Waluj Area Of Aurangabad)
त्याच वेळी पंढरपूरकडून वाळुजकडे कंटेनर (आरजे ०४ जीए - ८१६६) लोखंडी रोल घेऊन येत होता. भरधाव असलेली ही दोन्ही वाहने एकमेकांवर समोरासमोर जोरात धडकली. त्यामुळे आयशर टेम्पो पलटी झाला. तर कंटेनरचे दोन तुकडे होऊन लोखंडी रोल खाली पडला. सोमवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात आयशर टेम्पो चालक शेख जावेद शेख रमजानी (रा. गल्लेबोरगाव, ता. खुलताबाद) याचा जागीच मृत्यू झाला. तर कंटेनर चालक गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच नायगाव-बकलालनगर येथील युवा सेनेच्या रुग्णवाहिकेने धाव घेत जखमीला उपचारार्थ औरंगाबाद (Aurangabad) येथील घाटीत दाखल केले. मात्र डॉक्टरांनी शेख जावेद यास तपासून साडेबारा वाजेच्या सुमारास मृत घोषित केले. तर जखमी कंटेनर चालकाचे हात व पाय निकामी झाले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
गरवारे गेट बनले अपघातस्थळ
वाळुज महामार्गावरील गरवारे गेट समोर नायगाव, बकवालनगर आहे. येथून रात्रंदिवस वाहने सुसाट धावतात. सिग्नल असूनही येथे वाहतूक पोलीस नसतात. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होऊन दररोज लहान-मोठे अपघात होतात. परिणामी हे कुप्रसिद्ध अपघातस्थळ बनले आहे.
पहिल्या अपघातामुळे दुसरा अपघात
गरवारे गेटसमोर दोन अपघात झाले. पहिला अपघात दुपारी दुभाजकाला धडकल्याने कार चालक जखमी झाला. या अपघातात दुभाजकावरील दगड रस्त्यावर विखुरले होते. ते वेळीच न उचलल्यामुळे पुन्हा पहाटे साडेबाराच्या सुमारास टेंपो व कंटेनर यांचा अपघात झाला. असे एका प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
वेळीच उपाय योजना करा
वाळूज महामार्गावरील गरवारे गेट समोरून रस्ता जातो. येथे वाहतूक सिग्नल बसविण्यात आले आहे. मात्र येथे गतिरोधक किंवा पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे वाहने भरधाव धावतात. या ठिकाणी दोन्ही बाजूने गतिरोधक बसवून वेळीच उपाय योजना करावी. अशी मागणी युवा सेनेचे उपतालुका अधिकारी रमेश आरगडे, माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर राठोड, ग्रामपंचायत सदस्य अनिल वाघ, कुलदीप मगर, अमोल भावले, सोनु बनकर, नामदेव वाळके, सागर शिंदे, सुनील काळे आदींनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.