छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने मंगळवारी (ता.१०) राज्यपालांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या आंदोलकांनी राज्यपालांच्या भेटीचा आग्रह धरला. यावेळी त्यांनी घोषणाबाजी केली. सुभेदारी विश्रामगृह परिसरात हा प्रकार घडला. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.