औरंगाबाद : मराठवाड्यात मंगळवारी (ता. २५) दिवसभरात ३ हजार १६१ कोरोनाबाधित आढळले. लातुरमध्ये दोन तर नांदेडमध्ये एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात १ हजार ३८ रुग्णांची भर पडली. त्यात महापालिका हद्दीतील ७४८ तर ग्रामीण भागातील २९० जण आहेत.रुग्णसंख्या एक लाख ६३ हजार ३५ वर पोचली आहे. आणखी ७०५ रुग्ण बरे झाले. यात महापालिका क्षेत्रातील ५८०, ग्रामीण भागातील १२५ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत एक लाख ५१ हजार ६७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ८ हजार २९० जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत तीन हजार ६७८ जणांचा मृत्यू झाला आहे.(Marathwada Corona Update)
नांदेडला ४५४ बाधित
नांदेड जिल्ह्यात ४५४ कोरोनाबाधित आढळले. रुग्णसंख्या ९९ हजार ४३३ असून ९२ हजार ५७२ रुग्ण बरे झाले आहेत. चार हजार २०१ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, धर्माबाद तालुक्यातील ६८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात दोन हजार ६६० जणांचा मृत्यू झाला आहे.
परभणीत २९० रुग्ण
परभणी जिल्ह्यात २९० रुग्ण आढळले. रुग्णसंख्या ५४ हजार ५९३ असून सध्या दोन हजार ३०९ जणांवर उपचार सुरु आहेत. ५० हजार ९८५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एक हजार २९९ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात १५० रुग्ण आढळले. रुग्णसंख्या १७ हजार ५३० असून १६ हजार १९३ रुग्ण बरे झाले आहेत. ९४० जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३९७ जणांचा मृत्यू झाला आहे.
जालन्यात ३०६ रुग्ण
जालना जिल्ह्यात कोरोनाचे ३०६ रुग्ण आढळले. त्यात जालना शहरातील ११९ जण आहेत. रुग्णसंख्या ६५ हजार ४२३ असून ६१ हजार ९८६ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या दोन हजार २३२ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एक हजार २०५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
लातुरमध्ये दोघांचा मृत्यू
लातूर जिल्ह्यात सोमवारी (ता. २४) ४७५ रुग्ण दाखल झाले. ४५१ आरटीपीसीआर चाचण्यांतून २०६ तर एक हजार २१४ ॲन्टीजेन चाचण्यांतून २६९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्हिटी रेट २८.५ झाला आहे. रुग्णसंख्या एक लाख एक हजार २२७ वर पोचली असून ९४ हजार ४३९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या चार हजार ३२८ जणांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत दोन हजार ४६० जणांचा मृत्यू झाला आहे.
खासदार संजय जाधवांना कोरोनाची लागण
परभणी : येथील शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी काही जणांच्या संपर्कात आल्याने खासदार जाधव यांनी कोरोना चाचणी करून घेतली होती. दोन दिवसांपूर्वी चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रानी दिली. दरम्यान, संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.