12 new coronavirus cases In Hingoli
12 new coronavirus cases In Hingoli

CoronaUpdates : मराठवाड्यात नव्याने तीन हजार ८८८ जणांना कोरोनाची बाधा

औरंगाबादेत गेल्या चोवीस तासांत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात घाटी रुग्णालयात ९ , खासगी रुग्णालयात ६ रुग्णांचा समावेश आहे.
Published on

औरंगाबाद : मराठवाड्यात (Marathwada) बुधवारी (ता. १९) दिवसभरात ३ हजार ८८८ कोरोनाबाधित (Corona) आढळले. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्या अशी; बीड ९७५, लातूर ६४१, जालना ६१७, औरंगाबाद ५७८, उस्मानाबाद ४४९, परभणी ३६२, नांदेड २०८, हिंगोली ५९. उपचारादरम्यान आणखी ९३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात लातुरमध्ये २९, बीड १७, औरंगाबाद १५, परभणी १२, उस्मानाबाद ८, नांदेड ६, हिंगोली ४, जालन्यातील दोघांचा समावेश आहे. औरंगाबादेत (Aurangabad) गेल्या चोवीस तासांत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात घाटी रुग्णालयात ९ , खासगी रुग्णालयात ६ रुग्णांचा समावेश आहे. पाल फुलंब्री येथील महिला (वय ६०), वैजापूर येथील पुरुष (६०), पारगाव पैठण येथील पुरुष (६०), सिल्लोड येथील महिला (५५), गोंडगाव सोयगाव येथील पुरुष (६६), बाजाजनगर महिला (४८), लिंबगाव पैठण येथील पुरुष (२७), जैतापूर-कन्नड येथील महिला (७५), लाडगाव-कुंभेफळ येथील महिलेचा (८५) घाटीत तर पैठण येथील पुरुष (८४) शिवाजीनगरातील पुरुष (८०), आदित्यनगर हर्सुल येथील महिला (६३), जाधवमंडी येथील पुरुष (७०), सिडको एन-दोन येथील पुरुष (६१), हडको एन-बारा येथील पुरुषाचा (७१) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. (Marathwada Corona Updates Above Three Thousand Covid Cases Reported)

12 new coronavirus cases In Hingoli
करोना काळात अमित शाहांच्या 'सोशल' कामगिरीचं विश्लेषण

औरंगाबादेत ५७८ बाधित, ५४६ बरे

औरंगाबाद जिल्ह्यात ५७८ कोरोनाबाधित आढळले. त्यात शहरातील २१४, ग्रामीण भागातील ३६४ जणांचा समावेश आहे. रुग्णांची संख्या १ लाख ३८ हजार ६१३ झाली आहे. आणखी ५४३ रुग्ण बरे झाले. त्यात शहरातील ११२, ग्रामीण भागातील ४३४ जण आहेत. आजपर्यंत १ लाख २९ हजार २८९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ६ हजार ३४३ जणांवर उपचार सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()