कन्नड : मिनी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे बघितले जात असल्याने ही निवडणूक लक्ष्यवेधी होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल १४० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता अठरा जागेसाठी ८६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
राजकीय पक्षाचे चिन्ह नसल्याने सर्वच पक्षाचे उमेदवार विविध पॅनलमध्ये विभागले आहेत. त्यामुळे एकाच पक्षाचे उमेदवार परस्परांच्या विरोधात प्रचार करताना दिसणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना वाडेकर यांनी सांगितले की, बाजार समिती निवडणुकीसाठी २४७ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २१ अर्ज अपात्र ठरले. २२६ उमेदवारी अर्ज होते.
गुरुवारी १४० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. शुक्रवारी (ता.२१) सकाळी अकरा वाजेपर्यंत चिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून डी. डी. जैस्वाल, एस. आर. कास्तोडे, नीलेश पवार, विजय पाटील हे सहकार्य करत आहेत.
रिंगणात असलेले उमेदवार
अ असद अ.रज्जाक, अकोलकर कैलास, अल्हाड साईनाथ, बनसोड बबनराव, भवर गणेश, बोडखे अनिल, चव्हाण हंसराज, चव्हाण विनायक, चव्हाण युवराज, गाढवे खुशालराव, गायके रमेश, घुले प्रकाश, हार्दे कृष्णा, जाधव भाऊसाहेब, जाधव कृष्णा, जैन जयकुमार, कदम पुंडलिक, मनगटे देविदास, मनगटे कैलास, मोहिते बाबसाहेब, मोहिते शरद, मुरकुंडे बाबासाहेब, नागोडे परभत, निकम संजय, निकम
सुभाष, पाटील प्रवीण, पाटील संदीप, पवार अण्णासाहेब, पवार कल्याण, पवार किशोर, राजपूत गोकुळसिंग, राजपूत राजू, राठोड बाबुसिंग, शिंदे गणेश, थोरात भाऊसाहेब, थोरात शिवाजी, वेताळ मुकेश, बारगळ रंजना, बेाडखे प्रिया, घुले मंदाबाई, घुले सुनंदाबाई, जगताप शालिनी,मातेरे सविताबाई, पवार निर्मलाबाई,
पवार सुलोचनाबाई, शेलार अनिता, हिरे प्रकाश, कोल्हे भगवान, मोकासे सुनील, सोनवणे कांताराम, वाघ गणेश, घुगे देवमन, नरोटे मारुती, राठोड मनोज, राठोड उत्तमराव, सुसलादे प्रभाकर, बोडखे सुनील, चव्हाण नानासाहेब, गाडेकर प्रकाश, गोरे चंद्रभान, जाधव बाळासाहेब, जाधव महादू, निकम गोविंद, पठाण अमानउल्ला खान, पवार गीताराम, राठोड देविदास,
शिंदे योगेश, बेारसे जयेश, गायके अप्पासाहेब, मगर राजेंद्र, तायडे काकासाहेब, विकास बागूल, बाबासाहेब भैरव, दिलीप बनकर, अनिल शिरसाठ, मोगल वाघ, अब्दुल जावेद अब्दुल वाहिद, प्रकाश अग्रवाल, प्रशांत अग्रवाल, भगवान शेजवळ, हुकुमचंद पांडे, अब्दुल जाफर अब्दुल रफिक, उत्तम जाधव, विखर आली मुक्तार अली सय्यद, जावेदलाल शेख, शेख युसूफ शेख मुनीर.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू झाली. विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, संजना जाधव, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुभाष निकम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भाऊसाहेब थोरात,
गोकुळसिंग राजपूत, केतन काजे, प्रकाश घुले, बबनराव बनसोड, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष कृष्णा जाधव, बाबासाहेब मोहिते यांनी उशिरा पर्यंत उमेदवार जाहीर केले नाहीत. त्यामुळे अनेकांची घालमेल सुरू होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.