वाळूज : सध्या सोशल मीडियावर गर्भाशयाच्या कॅन्सर आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी रामबाण ठरलेल्या ‘एचपीव्ही’ लसीविरोधात एक व्हिडिओ व्हायरल झाला. मात्र, ही त्यातील माहिती निव्वळ खोटी आहे. त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले.
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सचिन चिटणीस, डॉ. अनघा दिवाण, डॉ. सुजित कोंडकर, डॉ. श्रद्धा परिटकर, डॉ. मल्लिका जोशी, डॉ. मिता चिटणीस यांची यावेळी उपस्थिती होती. डॉ. दिवाण म्हणाल्या, ‘‘गर्भाशय कॅन्सरचे आजघडीला १३ लाखांवर रुग्ण आहेत. या आजारामुळे दर सात मिनिटाला एक महिला मृत्युमुखी पडते.
याला कारण आहे तो ‘एचपीव्ही’ विषाणू. यावर प्रभावीपणे परिणामकारक अशी लस उपलब्ध आहे. ९ ते ४५ वयोगटातील किशोरवयीन मुली व महिला ही लस घेऊ शकतात. त्याचबरोबर ९ ते १६ वयोगटातील मुलेदेखील ही घेऊ शकतात.
या लसीचे महिलांच्या प्रजनन संस्थेवर, बीजकोषावर कुठलेही दुष्परिणाम होत नाहीत. व्हायरल पोस्टवर दर्शविल्याप्रमाणे महिलेच्या प्रजनन क्षमतेवर कुठलेही परिणाम होत नाहीत. या उलट उपलब्ध असणारी ही लस स्त्रियांमध्ये फक्त गर्भाशय मुखाचाच नाही, तर योनीमार्गाचा, शौचाच्या जागेचा, तोंडाचा, घशाच्या कर्करोगाचाही प्रतिबंध करते. त्याचबरोबर मुलांमध्ये लिंगाचा, तोंडाचा, घशाच्या कर्करोगाचा प्रतिबंध केला जातो.
या लसीचे इतर कुठलेही दुष्परिणाम होत नसल्याचे प्रयोगाअंती स्पष्ट झाले आहे. त्यामुळे व्हायरल होणाऱ्या पोस्टवर कुणीही विश्वास ठेवू नका. तो व्हिडिओ अशास्त्रीय माहितीवर आधारित आहे. आपल्या सभोवतालच्या किशोरवयीन मुली व महिलांना ही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करा, असे आवाहन त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.