अब्दुल सत्तारांनी खिल्ली उडविताच उपनगराध्यक्ष साबेर खान संतापले

हे प्रकरण अरे- कारे ते अश्लील भाषेवरून थेट अंगावर धावून जाण्यापर्यंत पोहोचले. उपस्थितांनी सारवासारव केल्यामुळे प्रकरण शमले
abdul sattar
abdul sattarabdul sattar
Updated on

वैजापूर (औरंगाबाद): महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान उपनगराध्यक्ष साबेर खान या एकाच पक्षातील दोघांमध्ये गुरुवारी (ता. २९) चांगलाच राडा झाला. सत्तारांनी शेलक्या भाषेत खिल्ली उडविल्यावरून खान चांगलेच संतापले. त्यामुळे हे प्रकरण अरे- कारे ते अश्लील भाषेवरून थेट अंगावर धावून जाण्यापर्यंत पोहोचले. उपस्थितांनी सारवासारव केल्यामुळे प्रकरण शमले.

याबाबत अधिक माहिती अशी की, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे तालुक्यातील घरगुती कार्यक्रमासह शहरातील औषधालय व गॅरेजच्या उद्घाटनासाठी २९ जूलै रोजी शहरात ताफ्यासह आले होते. शहरातील डेपो रस्त्यावरील औषधालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सत्तार यांनी सेनेचे उपनगराध्यक्ष साबेर खान यांच्या संदर्भात उपहासात्मक पद्धतीने टीका केली. साबेर खान आता म्हातारे झाले असून, त्यांची कानपूर लाईन खराब झाल्याने त्यांना आता ऐकायला येत नाही. असे सत्तार भरगच्च कार्यक्रमात बोलले. या कार्यक्रमास साबेर खान तेथे उपस्थित नव्हते. परंतु, त्यांच्या चेल्यांनी सत्तारांचे बोल त्यांच्या कानापर्यंत पोहोचवले. त्यामुळे साबेर खान यांनाही टीका झोंबल्याने त्यांचा पारा चढला.

abdul sattar
Corona Update: २४ तासांत बीडमध्ये १८० नवे रुग्ण

काही वेळातच हा कार्यक्रम आटोपून सत्तार हे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील एका गॅरेजच्या उद्घाटनासाठी हजर झाले. याच कार्यक्रमासाठी साबेर खानही हजर झाले. दोघेही आमने- सामने येताच साबेर खान यांचा राग अनावर झाला. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता स्वपक्षातीलच मंत्री सत्तार यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवायला सुरवात केली. ‘तुम्ही असाल मंत्री, मला त्याच्याशी काही देणेघेणे नाही अन् मी तुम्हाला काहीच समजत नाही. मजाक, खिल्ली किती उडवावी. याला काही मर्यादा असतात. यापूर्वीही बहुतांश वेळा असे प्रकार झाले’. असे म्हणून त्यांच्या अंगावर धावून गेले असता अन्य नेते व कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून मोठा राडा करण्यापासून परावृत्त केले. या राड्यात एकेरी भाषा वापरून अश्लील शिवीगाळ झाल्याने उपस्थित सर्वच अचंबित झाले.

abdul sattar
वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे हिंगोलीत तरूण विवाहितेचा गेला जीव

‘हम भी यहाँ के शेर हैं’-
साबेरखान यांच्या रुद्रावतार व शाब्दिक हल्ल्याने सत्तार पुरते घायाळ झाले अन् थोडे नमते घेतले. विशेष म्हणजे सार्वजनिक ठिकाणी एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये हा राडा झाल्याने शहरात हा खुमासदार चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, सत्तारांनी गॅरेजच्या कार्यक्रमात पाय ठेवताच साबेर खान यांनी तुम्ही मंत्री आहात. परंतु, मी देखील गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात असून, ‘हम भी यहाँ के शेर हैं’ असे ठणकावून सांगत दंड थोपटले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()